
स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरचा वापर कमी करून मेंदूला विश्रांती द्या.
रोज 10-15 मिनिटे ध्यान आणि शारीरिक व्यायामाने मेंदूचे आरोग्य सुधारा.
ओमेगा-3, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिनयुक्त आहाराने मेंदूची कार्यक्षमता वाढवा.
How to protect brain health in the digital age: मेंदू हा आपले विचार, हालचाल, आठवणी आणि भावना नियंत्रित करतो. एवढे महत्त्व असूनही गंभीर समस्या उद्भवत नाही, तोवर मेंदूच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. याबाबत जागरूकता दाखविल्यास दीर्घकालीन नुकसान टाळणे शक्य आहे. यामुळे नियमित मेंदू आरोग्य तपासणीला प्राधान्य देण्याचे आवाहन, केअर सिग्मा रुग्णालयाच्या वतीने वर्ल्ड ब्रेन डे निमित्त करण्यात आले.