

Check PUC Certificate Expiry Date Online via Parivahan
esakal
Parivahan PUC Check Guide: तुमच्याकडे कार किंवा दुचाकी असेल, तर वाहनाच्या कागदपत्रांबाबत नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. रस्त्यावर वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स आणि इन्शुरन्ससोबतच वैध PUC म्हणजेच Pollution Under Control सर्टिफिकेट असणे आवश्यक असते. या प्रमाणपत्रावरून वाहनातून बाहेर पडणारा धूर निर्धारित प्रदूषण नियमांच्या मर्यादेत आहे की नाही, हे स्पष्ट होते.
अनेक वाहनचालक एकदा PUC काढल्यानंतर त्याची मुदत कधी संपते, याकडे दुर्लक्ष करतात. मुदत संपल्यानंतरही वाहन रस्त्यावर नेल्यास वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जाऊ शकतो आणि खिशावर अतिरिक्त भार पडू शकतो. पण, या माहितीसाठी कुठेही जाण्याची गरज नसून घरबसल्या मोबाइलवरूनच एक्सपायरी डेट सहज पाहता येते.