Pune : सूर्यास्तानंतर पाहा पाच ग्रहांची युती

क्षितिजावर बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि युरेनस पाहण्याची दुर्मिळ संधी
miracle of conjunction of Moon and Venus is going to happen on 24 march jalgaon news
miracle of conjunction of Moon and Venus is going to happen on 24 march jalgaon newsesakal

पुणे : पश्चिमेच्या क्षितिजावर सूर्यास्तानंतर पाच ग्रहांचे संमेलन भरत असून, पुणेकरांनाही या दुर्मिळ खगोलिय घटनेचा आनंद घेता येणार आहे. चंद्राबरोबरच बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि युरेनस ही पाच ग्रहे एकाच वेळी क्षितिजावर दिसत आहे. साधारण पुढील आठवडाभर तरी यातील बहुतेक ग्रहांची युती कायम राहणार आहे.

आपल्याच सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरता फिरता वर्ष-दीड वर्षातून एका सरळ रेशेत येतात. म्हणजे पृथ्वीवरून तरी निदान त्याचा भास होतो. खगोलशास्त्राची आवड असणाऱ्या नागरिकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष ग्रह दाखवण्याची ही अनमोल संधी आहे. उघड्या डोळ्यांबरोबरच दूर्बिणीचा वापर केला तर ग्रहांसोबत त्यांचे चंद्रही पाहण्याची संधी आपल्याला मिळते. रात्रीच्या आकाशात आपल्या चंद्राच्या आजूबाजूला दिसणाऱ्या या ग्रहांच्या संमेलनाचा घेतलेला हा आढावा....

काय दिसतंय?

सूर्यास्तानंतर लगेचच सूर्यमालेतील पहिला आणि सर्वात लहान असलेल्या बुध ग्रहाचे दर्शन होते. त्याच्याबरोबरच आकाराने सर्वात मोठा असलेला गुरू ग्रहही दिसतो. थोडा वेळ गेल्यानंतर पश्चिमेच्या क्षितिजाच्या वरच्या बाजूस सर्वात तेजस्वी असा शुक्र ग्रह दिसतो. त्याच्या वरील बाजूस युरेनस ग्रह आहे. मात्र, त्याला स्पष्ट पाहण्यासाठी आपल्याला दूर्बिणीचा वापर करावा लागेल. त्यानंतर बरोबर आपल्या डोक्यावर चंद्राच्या शेजारी लालसर रंगाता मंगळ ग्रह आपल्याला दिसेल.

miracle of conjunction of Moon and Venus is going to happen on 24 march jalgaon news
Pune: “आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड?” माजी सैनिकाच्या मुलाचा पडळकरांना सवाल; बॅनर व्हायरल

कुठे आणि किती वेळ दिसेल?

सूर्यास्तानंतर पश्चिमेच्या क्षितिजावर अर्धा ते पाऊण तास पाचही ग्रह आपल्याला दिसतील. त्यानंतर पुढील एक ते दीड तास चार ग्रहांच्या संमेलनाचा लाभ घेता येईल. विशेष म्हणजे ग्रहांची दिशा आणि स्थिती दर्शविणारे अनेक मोबाईल अॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. ज्यामध्ये Stellarium, SkyMap या मोफत अॅपचा समावेश आहे.

कसे पाहाल?

- जास्तितजास्त उंच किंवा काळोख असलेल्या सुरक्षित ठिकाणी जावे

- युरेनस वगळता सर्व ग्रह उघड्या डोळ्यांनीही आपल्याला दिसतील.

- पण अधिक स्पष्टतेसाठी घरातील साधी दूर्बिण किंवा उपलब्ध असल्यास दूरदर्शक दूर्बिणीचा (टेलिस्कोप) वापर करावा

- यामुळे ग्रहांच्या स्पष्टतेबरोबरच गुरू ग्रहाचे चार चंद्र आणि शुक्र ग्रहाच्या कलाही पाहता येतील

- खगोलप्रेमी संस्था, महाविद्यालये आदींकडे टेलिस्कोप उपलब्ध असतील तर तेथे जावे

miracle of conjunction of Moon and Venus is going to happen on 24 march jalgaon news
Pune Viral Video : पुणे तिथे काय उणे! चक्क श्वानसाठी हेल्मेट

साधारण दीड-एक वर्षांनी या पाच ग्रहांचे संमेलन आपल्याला पाहता येते. तुम्ही जितक्या उंच ठिकाणी असाल, तेवेढे तुमचे क्षितिज अधिक स्पष्ट दिसेल. कमी प्रकाश असलेल्या सुरक्षित जागेची निवड ग्रहांची युती पाहण्यासाठी करावी. तीन ते साडेतीन महिन्यांनी पहाटेच्या आकाशातही ग्रहांची ही स्थिती पाहता येईल.

- अथर्व पाठक, खगोल अभ्यासक, पुणे नॉलेज क्लस्टर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com