Kolhapuri QR : ‘कोल्हापुरी’साठी ‘क्यूआर कोड’ ; मोबाईलने होणार चीप स्कॅन,बनावट उत्पादनास बसणार चाप

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झाला असून, कोल्हापुरी चपलेस ‘क्यूआर कोड’ मिळाला आहे. चपलेच्या आत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक छोटी चीप बसविण्यात आली असून, ही चप्पल मोबाईलने स्कॅन करताच ही कुठे बनवली, कोणत्या कारागिराने बनवली, याची माहिती उपलब्ध होणार आहे.
Kolhapuri QR
Kolhapuri QRsakal
Updated on

मुंबई : ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झाला असून, कोल्हापुरी चपलेस ‘क्यूआर कोड’ मिळाला आहे. चपलेच्या आत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक छोटी चीप बसविण्यात आली असून, ही चप्पल मोबाईलने स्कॅन करताच ही कुठे बनवली, कोणत्या कारागिराने बनवली, याची माहिती उपलब्ध होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता बनावट कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्यांवर आणि या बनावट चपलांच्या विक्रीवरही चाप बसणार आहे.

बाजारात बनावट कोल्हापुरी चपलांचा सुळसुळाट वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (लिडकॉम) नवा प्रयोग राबवत कोल्हापुरी चपलांना ‘क्यू आर’ कोड दिला आहे. ग्राहकांना अस्सल आणि चांगली कोल्हापुरी चप्पल मिळावी यासाठी ‘लिडकॉम’ने ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित नवीन चपला विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. हे तंत्रज्ञान इमरटेक इनोव्हेशन प्रा. लि. या कंपनीने बनविले आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे आता ग्राहकांना आता मोबाईलच्या एका क्लिकवर कोल्हापुरी चप्पल ही अस्सल आहे की बनावट आहे हे सहज ओळखता येणार आहे.

Kolhapuri QR
National Science Day : सी.व्ही. रामन यांना पडलेला 'तो' प्रश्न त्यांना नोबेलपर्यंत घेऊन गेला

विशेष म्हणजे चपलांमध्ये अशाप्रकारे तंत्रज्ञान प्रथमच वापरले जात आहे. उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत प्रत्येक गोष्टीची माहिती यात ठेवली जाते. हा प्रयोग महाराष्ट्रात नाशिक येथील सह्याद्री फार्म येथील विविध प्रकारच्या फळभाज्यांबरोबरच कापूस, रबरच्या विक्रीमध्ये केला गेला आहे. त्याला चांगले यश मिळाले असल्याची माहिती इमरटेक इनोव्हेशन प्रा. लि. या कंपनीचे संस्थापक गौरव सोमवंशी यांनी माध्यमांना दिली.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या कोल्हापुरी चपलांसाठी ब्लॉक चेन या प्रयोगअंतर्गत ‘क्यूआर कोड’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याचे अनावरण राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. ‘लिडकॅाम’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात चामड्याच्या वस्तूंचे एक मार्च २०२४ पर्यंत प्रदर्शन व विक्री सुरू राहणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक लाख उमेदवारांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे.

- सुमंत भांगे, सचिव, सामाजिक न्याय विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com