A car engine bay showing damaged electrical wires caused by rats, highlighting the need for rodent prevention measures.
esakal
विज्ञान-तंत्र
Car-Bike Safety Tips : उंदरांमुळे गाडीला आग लागण्याचा धोका! कारण, नुकसान अन् बचावाचे 6 उपाय; पाहा कार, ई-बाइकला कसं वाचवाल?
Rat Damage in Car e-vehicle safety tips : उंदरांमुळे गाडीला आग लागण्याचा धोका! वेळीच करा हे उपाय
उंदरांमुळे वाहनांना होणारे नुकसान हा कार आणि ई-बाइक असणाऱ्यांसाठी एकदम डोकेदुखीचा विषय ठरत आहे. बहुतांश वेळा हे नुकसान केवळ आर्थिक मर्यादेत अडकत नाही, तर थेट वाहनाच्या सुरक्षिततेवरही परिणाम करते. उंदीर गाडीतील महत्त्वाच्या इलेक्ट्रिकल वायर कुरतडतात. परिणामी शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता वाढते आणि काही प्रसंगी वाहनाला आग लागण्यासारख्या धोकादायक घटना घडू शकतात. शहरांमध्ये पार्किंगची अडचण आणि जास्तकाळ वाहन न वापरल्याने उंदरांचा उपद्रव अधिक वाढताना दिसतो.

