जग्वार, लँड रोव्हर नाही, तर रतन टाटांना मिळाली खास इलेक्ट्रिक नॅनो | Ratan Tata Gets Nano EV | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ratan tata gets a custom built electric nano of range 213 km in single charge see details rak94

जग्वार, लँड रोव्हर नाही, तर रतन टाटांना मिळाली खास इलेक्ट्रिक नॅनो

देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोक मोठ्या प्रमाणात EV कार खरेदी करत आहेत. या दरम्यान Tata Motors आणि इतर वाहन निर्मात्यांना EV पॉवरट्रेन पुरवठा करणार्‍या Electra EV ने अलीकडे रतन टाटा (Ratan Tata) यांना कस्टम-बिल्ट इलेक्ट्रिक नॅनो कार दिली. Electra EV ने Linkedin वर याबद्दल माहिती देत या कारसोबतचा टाटा यांचा फोटो शेअर केला आहे

जग्वार आणि लँड रोव्हर या लक्झरी कार म्हणून जगात ओळखल्या जातात. या ब्रँड्समधील हाय-एंड मॉडेलची किंमत कोटींमध्ये आहे. हे ब्रँड सध्या रतन टाटा यांच्या मालकीचे आहेत. पण या गोष्टी बाजूला ठेवून रतन टाटा यांनी सर्वसामान्यांसाठी नॅनो कार निवडण्यात आली हे विषेश आहे. Tata Electra ने खास रतन टाटा यांच्यासाठी कारची नॅनो ईव्ही (Nano EV) व्हर्जन विकसित केले आहे. रतन टाटा यांना त्यांच्या गरजेनुसार मॉडीफाईड केलेली ईव्ही नॅनो दिली. रतन टाटा आणि त्यांचे सहाय्यक शंतनू नायडू यांनी कारमधून प्रवास देखील केला.

हेही वाचा: उभ्या गाड्यांनाही आगीचा धोका! Hyundai, Kia ने लाखो कार मागवल्या परत

कार एका चार्जवर 213 किमी

कस्टम-बिल्ट नॅनो EV मध्ये वापरलेले 72V आर्किटेक्चर वापरण्यात आले आहे असून टिगोर इव्हीत देखील हीच पावरट्रेन वापरली आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या स्टँडर्ड्सनुसार रतन टाटा यांच्यासाठी बनवलेली ही नॅनो 72V इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 213 किमी प्रवास करणे अपेक्षित आहे आणि प्रत्यक्षात किमान 160 किमी चालेल. तसेच ही कार शून्य ते दहा सेकंदात ताशी 60 किलोमीटरचा वेग गाठू शकते. तसेच यामध्ये लिथियम आयन बॅटरी वापरण्यात आली आहे.

रतन टाटा यांनी सामान्य माणसाला कार प्रवास सुलभ करण्याच्या उद्देशाने नॅनो सादर केली होती. अवघ्या 1 लाखाहून कमी बजेटमध्ये मिळणाऱ्या या कारला बाजारात अपेक्षेइतके यश मिळाले नाही, परंतु या कारने मध्यमवर्गीयांच्या जवळ आणले. टाटा समूहाच्या लक्झरी कार तसेच नेक्सन आणि टिगोर सारखी इलेक्ट्रिक वाहने देखील उपलब्ध आहेत.

हेही वाचा: Tata च्या देशातील सर्वात स्वस्त SUV ला ग्राहकांची पसंती, पाहा डिटेल्स

Web Title: Ratan Tata Gets A Custom Built Electric Nano Of Range 213 Km In Single Charge See Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..