WhatsApp Trick : WhatsApp ची ही ट्रीक तुम्हाला माहितेय का? डिलीट झालेले मेसेजही पुन्हा वाचणं शक्य

WhatsApp Message Recovery : जर तुम्हालाही अशा डिलीट झालेल्या मेसेजमध्ये नेमकं काय पाठवण्यात आलं होतं हे जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर यासाठी काही ट्रीक तुम्ही वापरू शकता
व्हाॅटसअॅपवरचे डिलिट झालेले मेसेज वाचणे शक्य
व्हाॅटसअॅपवरचे डिलिट झालेले मेसेज वाचणे शक्यEsakal

WhatsApp Hacks : सध्याच्या घडीला मोबाईल ही प्रत्येकासाठीच महत्वाची गोष्ट ठरली आहे. या मोबाईलमधील अनेक अॅप्सपैकी व्हाटस्अप हे त्यातील एक महत्वाचं अॅप आहे. या अॅपमुळे App कुटुंबियांसोबत संपर्क करणं सोप झालं आहे. read deleted whatsapp messages secret trick notification history app

एवढचं नव्हे तर कामाच्या ठिकाणी देखील व्हाॅट्सअॅपचा Whatsapp वापर महत्वाचा ठरतोय. एखादा मेसेज पाठवण्यासोबतच फोटो, व्हिडीओ, ऑडिओ मेसेस तसचं डॉक्युमेन्ट्स पाठवण्यासाठी या अॅपचा App उपयोग होतो. यातच आता व्हाॅटस्अॅप नवेनवे फिचर लॉन्च करत आहे. 

व्हाॅटस्अॅपने काही वर्षांपूर्वी मेसेज डिलीट करण्याचं नवं फिचर लॉन्च केलं होते. Delete For Everyone या फिचरच्या मदतीने सेंड केलेला मेसेज पुढील २ दिवसात डिलीट करता येतो. असं असलं तरी डिलीट केलेल्या मेसेजचं समोरच्या व्यक्तीला WhatsApp Notification नोटिफिकेशन जातं. यामुळे त्या व्यक्तीला अनेकदा चुकून मेसेज केला गेल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. 

अनेकदा तुम्हालाही एखादा व्हाॅटस्अॅप मेसेज येऊन ते पाठवणाऱ्याने डिलीट केलं असेलच. ते वाचण्याच्या आतच डिलीट झाल्याने मेसेजमध्ये काय असेल हे जाणून घेण्याची अनेकदा उत्सुकता असते. इंन्स्टाग्राम किंवा फेसबुकची चॅट सिस्टममधूल डिलीट फिचर उत्तम आहे. याच एकदा मेसेज डिलीट केला की तो पूर्णपणे डिलीट होतो. शिवाय सेंडरला त्याबद्दल कल्पनाही नसते. व्हाॅटस्अॅपवर मात्र सेंडरला आपल्याला काही तरी मेसेज सेंड झाल्याची कल्पना येते.

हे देखिल वाचा-

व्हाॅटसअॅपवरचे डिलिट झालेले मेसेज वाचणे शक्य
WhatsApp Companion Mode: आता एकाच वेळी ४ मोबाईलवरून चॅटिंग करणं शक्य

जर तुम्हालाही अशा डिलीट झालेल्या मेसेजमध्ये नेमकं काय पाठवण्यात आलं होतं हे जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर यासाठी काही ट्रीक तुम्ही वापरू शकता. डिलीट झालेला किंवा चूकून पाठवण्यात आलेला मेसेज काय आहे हे जाणून घेत असाल तरी तो वाचल्यानंतर सेंडरला त्रास देऊ नका. खरं तर डिलीट झालेले हे मेसेज वाचण्याचे अनेक मार्ग आहेत. यात नोटिफिकेशन हिस्ट्री किंना थर्ड पार्टी अॅपची तुम्ही मदत घेऊ शकता. Whatsapp Deleted Messages

Notifications History मध्ये दिसेल मेसेज

जर तुम्ही एखादा जुना अँड्रॉईड मोबाईल वापरत असाल आणि त्यात Android 11 वर आधारित सॉफ्टवेअर असेल तर तुम्हाला डिलीट झालेले मेसेजेस वाचणं सहज शक्य आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही स्टेप्स सांगतो. How to read WhatsApp Deleted Messages

  • तुमच्या डिव्हाईसच्या Setting मध्ये जा. 

  • इथे तुम्हाला Apps & Notifications हा पर्याय निवडायचा आहे.

  • Notifications वर क्लिक करून Notifications History मध्ये जा.

  • इथं तुम्हाला पाठवण्यात आलेला मात्र तुम्ही वाचण्याच्या आत डिलीट केलेला मेसेज तुम्ही पाहू शकता.

  • इथं मागील २४ तासातील नोटीफिकेशन्स तुम्ही पाहू शकता.

अशा प्रकारे तुम्हाला सेंडरने काय मेसेज केला होता  हे कळू शकतं.

हे देखिल वाचा-

व्हाॅटसअॅपवरचे डिलिट झालेले मेसेज वाचणे शक्य
WhatsApp Tips : Whatsup वर झालाय हॅकर्सचा सुळसुळाट; करू नका ही चूक, मोबाईल होईल हॅक अन्...

थर्ड पार्टी अॅपच्य़ा मदतीने मेसेज वाचणं शक्य

तुमच्या फोनवर येणाऱ्या नोटीफिकेशन्सचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी तुम्ही काही थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करू शकता. अर्थात यात तुमची प्रायव्हसी धोक्यात येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. या अॅप्सपैकी एक म्हणजे Get Deleted Messages तुम्ही उपयोग करू शकता.

  • यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला प्ले स्टोरवरून Get Deleted Messages हे अॅप डाउनलोड करावं लागेल. 

  • हे अॅप इन्सॉल केल्यानंतर ते तुमच्या मेसेजच्या अॅक्सेससाठी शिवाय इतर काही परवानग्या मागू शकते. ही परवानगी तुम्हाला द्यावी लागले.

  • आता तुमच्या फोनच्या नोटीफिकेशन विंडोमध्ये येणारे सर्व मेसेज या अॅपमध्ये सेव्ह होतील. 

  • त्यामुळे एखाद्या सेंडरने व्हाॅटसअॅपवरु एखादा मेसेज करून डिलीट केला असेल तर तो तुम्ही या अॅपमध्ये वाचू शकता.  

या दोन्ही ट्रीक टेक्स्ट मेसेजसाठी उपयोगी पडतात. डिलीट करण्यात आलेली एखादी मल्टिमीडिया फाइल यामुळे तुम्ही पाहू शकत नाही. म्हणजेच एखाद्याने काही लिहून पाठवले असेल आणि डिलीट केले असले तर ते तुम्ही वाचू शकता. मात्र डिलीट झालेला फोटो किंवा व्हिडीओ पाहणं शक्य नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com