4 कॅमेरा असणारा Realme 5 लाँच

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo च्या Realme ने आज भारतात दोन नवे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Realme 5 आणि Realme 5 Pro हे दोन फोन्स लाँच केले आहेत.

नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo च्या Realme ने आज भारतात दोन नवे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Realme 5 आणि Realme 5 Pro हे दोन फोन्स लाँच केले आहेत.

Realme 5 Pro हा स्मार्टफोन जगातील एकमेव असा फोन असेल, यामध्ये 48 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा म्हणजेच 4 कॅमेरा असलेला असेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे तीन मॉडेल नुकतेच लाँच केले आहेत.

Realme 5 Pro मध्ये 4 रिअर कॅमरा आहे. यामधील एक f/1.8 अपर्चरसह 48 मेगापिक्सल Sony IMX586 सेंसर देण्यात आला आहे. दुसरा 8 मेगापिक्सल वाइड अँगल सेंसर, तिसरा f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स तर चौथा f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसिंग कॅमरा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये सेल्फीसाठी फ्रंटला 16 मेगापिक्सल HDR कॅमरा दिला आहे.  

4 सप्टेंबरपासून होणार विक्री

फ्लिपकार्ट आणि realme.com वर Realme 5 Pro ची विक्री येत्या 4 सप्टेंबरपासून सुरु केली जाणार आहे. तर Realme 5 ची विक्री 27 ऑगस्टपासून सुरु होईल. 

Realme 5 Pro किंमत 

Realme 5 Pro 4GB+64GB – 13,999 रुपये
Realme 5 Pro 6GB+64GB – 14,999 रुपये
Realme 5 Pro 8GB+128GB – 16,999 रुपये

Realme 5 ची किंमत 

Realme 5 3GB+32GB –  9,999 रुपये
Realme 5 4GB+64GB – 10,999 रुपये
Realme 54GB+128GB – 11,999 रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Realme 5 Realme 5 Pro launched in India prices start 9999