Realme ची रेकॉर्डब्रेक विक्री; फक्त तीन मिनिटात विकले 233 कोटीचे फोन

Realme GT2 Series
Realme GT2 Series

Realme GT2 Series Sale : काही दिवसांपूर्वी Realme ने चीनमध्ये एक लॉन्च इव्हेंट आयोजित केला आणि त्यामध्ये त्यांचे लेटेस्ट स्मार्टफोन Realme GT2 आणि GT2 Pro लाँच केले आहेत. आज हे दोन्ही स्मार्टफोन्स पहिल्यांदाच चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले असून, विक्री सुरु होताच फोनला प्रचंड प्रतिसाद मिळाला. Gizmo चायनाच्या रिपोर्टनुसार Realme GT2 सीरीजच्या पहिल्या विक्रीच्या डेटानुसार कंपनीने अवघ्या तीनच मिनिटांत 200 दशलक्ष युआन म्हणजे तब्बल 223 कोटींची कमाई केली आहे.

Realme GT2 सीरीज फोन्सची किंमत

Realme GT2 ची किंमत : 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह Realme GT2 च्या बेस मॉडेलची किंमत 2,599 युआन ( 30,312 रुपये) आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 2,799 युआन ( 32,613 रुपये) आहे. तसेच 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 3,099 युआन (36,105 रुपये) आहे.

Realme GT2 Pro ची किंमत : 8GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 3,699 युआन ( 43,076 रुपये), तर 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 3,999 युआन (46,567 रुपये) आहे. 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 4,299 युआन ( 50,057 रुपये) आहे, तर 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेल्या टॉप-एंड मॉडेलची किंमत 4,799 युआन (55,925 रुपये) आहे.

Realme GT2 Series
लस घेतल्यावर देखील अनेकांना कोरोना का होतोय, जाणून घ्या सर्वकाही

फीचर्स काय आहेत?

सीरीजच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास Realme GT2 मध्ये 6.62-इंचाचा Samsung E4 AMOLED डिस्प्ले दिला असून 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. दुसरीकडे, प्रो मॉडेल 3216 x 1440 पिक्सेलच्या 2K स्क्रीन रिझोल्यूशनसह, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1400nits पर्यंत ब्राइटनेससह 6,7-इंच LPTO AMOLED डिस्प्लेसह देण्यात आला आहे.

फोनमध्ये GT2 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आहे तर GT2Pro लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 SoC देण्यात आले आहे . दोन्ही डिव्हाईसमध्ये डायमंड आइस कोअर कूलिंग सिस्टम प्लस देखील दिली आहे. स्मार्टफोन्स कंपनीच्या Realme UI 3.0 सह लेटेस्ट Android 12 ऑपरेटिंग सिस्टम आउट-ऑफ-द-बॉक्स वर चालतात. फोन 5,000mAh बॅटरी दिली असून ती 65W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीने सुसज्ज आहे.

Realme GT2 Series
शाओमीचा सर्वात फास्ट चार्जिंग स्मार्टफोन भारतात लॉन्च; वाचा डिटेल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com