
श्याओमीने काही दिवसांपूर्वी आपला Pad 6 हा टॅबलेट लाँच केला होता. त्यानंतर १९ जुलै रोजी रिअलमीने देखील आपला Pad 2 हा टॅब लाँच केला. तुम्ही यापैकी एक टॅब घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
रिअलमी आणि श्याओमी यापैकी कोणता टॅब घ्यावा हे ठरवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. या दोन्ही टॅबलेट्सच्या किंमती आणि फीचर्सची तुलना पाहून तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य असणारा टॅबलेट निवडू शकाल.
डिस्प्ले
Realme Pad 2 या टॅबमध्ये 11.5 इंच मोठा 2K डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर Xiaomi Pad 6 मध्ये 11 इंच मोठा 2.8K कलर डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. (Best affordable Tablet)
प्रोसेसर
रिअलमीच्या टॅबलेटमध्ये हेलिओ G99 चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, श्याओमीच्या टॅबलेटमध्ये स्नॅपड्रॅगन 870 हा प्रोसेसर आहे.
बॅटरी
रिअलमीच्या टॅबलेटमध्ये 8360mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33W सुपरव्हूक चार्जिंगला सपोर्ट करते. तर, श्याओमीच्या Pad 6 मध्ये 8840mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. यामध्ये देखील 33W चार्जिंग सपोर्ट आहे.
इतर फीचर्स
रिअलमी Pad 2 मध्ये डॉल्बी अॅटमॉस क्वाड स्पीकर्स आहेत. तसेच, यात स्क्रीन मिररिंग, ड्युअल विंडो, स्प्लिट स्क्रीन, स्मार्ट साईडबार, रीडिंग मोड 2.0 असे फीचर्स दिले आहेत.
किंमत
या दोन्ही टॅबलेटमधील किंमतीत भरपूर फरक आहे. कित्येकांसाठी ही गोष्ट निर्णायक ठरू शकते.
रिअलमी पॅड 2 च्या 6GB+128GB व्हेरियंटची किंमत 19,999 रुपये आहे. तर 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 22,999 रुपये आहे. दुसरीकडे, श्याओमी पॅड 6 च्या 6GB+128GB व्हेरियंटची किंमत 26,999 रुपये आहे. तर, 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 28,999 रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.