आला रे आला भारतात Realme X आला (व्हिडिओ)

गौरव मुठे
Monday, 15 July 2019

काय आहेत फोनची वैशिष्ट्ये:
यात नॉच देण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकाला पूर्ण स्क्रिनचा आनंद घेता येणार आहे. 

- 6.53 इंचाचा फूल एचडी प्लस बेजल लेस एमोलेड डिस्प्ले, रिझॉल्युशन 2340x1080 पिक्सल, पिक्सल साईज आधीच्या तुलनेत 44 टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे.

- पॉवरफुल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, मोटोराइज्ड पॉप-अप सेल्फी कॅमेरा 

- अँड्रॉइड 9.0 Pie ऑपरेटिंग सिस्टम, 3765 एमएएच बॅटरी, फास्ट चार्जिंग सपोर्ट 

नवी दिल्ली: बहुप्रतिक्षित रिअलमीचा पॉप-अप कॅमेरा असलेला रिअलमी एक्स आज (सोमवार)नवी दिल्ली येथे लाँच करण्यात आला आहे. पॉप-अप कॅमेरा असलेला रिअलमी एक्स कंपनीचे सीईओ, इंडिया माधव सेठ यांनी फोन सादर केला. 

रिअलमी एक्स हा स्मार्टफोन चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आला होता. आता भारतात आगमन झाले असून तो दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर रिअलमी 3i लाँच करण्यात आला आहे

काय आहेत फोनची वैशिष्ट्ये:
यात नॉच देण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकाला पूर्ण स्क्रिनचा आनंद घेता येणार आहे. 

- 6.53 इंचाचा फूल एचडी प्लस बेजल लेस एमोलेड डिस्प्ले, रिझॉल्युशन 2340x1080 पिक्सल, पिक्सल साईज आधीच्या तुलनेत 44 टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे.

- पॉवरफुल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, मोटोराइज्ड पॉप-अप सेल्फी कॅमेरा 

- अँड्रॉइड 9.0 Pie ऑपरेटिंग सिस्टम, 3765 एमएएच बॅटरी, फास्ट चार्जिंग सपोर्ट 

कॅमेरा - 48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल ड्युएल रिअर कॅमेरा(सोनी IMX586 कॅमेरा - सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा मोटोराइज्ड पॉप-अप कॅमेरा, रात्रीच्या वेळी फोटो काढण्यासाठी कॅमेऱ्यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

रॅम आणि स्टोरेज - 4 जीबी रॅम+ 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम+ 128जीबी स्टोरेज अशा  दोन व्हेरिएंटमध्ये स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला. दोन्ही फोनमध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.

डॉल्बी ऍटमॉस: यामुळे मोबाईलवर पिक्चर बघण्याचा, आवाज ऐकण्याचा आनंद द्विगुणित होणार आहे. व्हिडिओमधील सर्व बारीकसारीक आवाज देखील यातून स्पष्ट ऐकू येतील.

दोन मुख्य रंगात उपलब्ध पोलर व्हाईट, आणि निळ्या रंगात.

रिअलमी सॅमसंगला मागे टाकत भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे.

रिअलमी X किंमत 
जीबी रॅम+ 128 जीबी स्टोरेज 16999  रुपये
8 जीबी रॅम+ 128जीबी स्टोरेज 19999 रुपये
18 जुलै पासून ऑनलाईन उपलब्ध आहे तर 24 जुलैपासून स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहे.

रिअलमी X मास्टर (ओनीयन अँड गार्लिक) 19999 रुपये 

रिअलमी 3i:
डायमंड कट डिझाइन
3 जीबी रॅम 32 जीबी 7999
4 जीबी रॅम 64 जीबी 9999

येत्या 23 जुलैपासून हा फोन फ्लिपकार्टवर ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Realme X mobile launched in India