4GB रॅमसह येतोय रेडमी 10; मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 11T 5G
Redmi Note 11T 5GGoogle

Redmi 10 (2022) स्मार्टफोन अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर स्पॉट झाला आहे, या मध्ये फोनच्या लॉन्च आणि कॅमेरा फीचर्सबद्दल माहिती समोर आली आहे. तसेच ताज्या रिपोर्टनुसार, हा फोन FCC सर्टिफिकेशन साइटवर लिस्टेड झाला आहे, जिथे फोनच्या रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनबद्दल माहिती दिली आहे. नुकतीच बातमी आली होती की Redmi 10 (2022) सीरीजमधील दोन स्‍मार्टफोन भारतात लॉन्‍च केले जाऊ शकतात. यामध्ये Redmi 10 (2022) आणि Redmi 10 Prime (2022) फोनचा समावेश असू शकतो.

Mysmartprice च्या ताज्या रिपोर्टनुसार मॉडेल क्रमांक 22011119UY हा स्मार्टफोन FCC सर्टिफिकेशन साइटवर लि्स्ट केला गेला आहे, जो मॉडेल क्रमांक Redmi 10 (2022) असल्याचे मानले जाते .स्मार्टफोनचा. FCC लिस्टनुसार, हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉंच केला जाऊ शकतो, यामध्ये 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज आणि 4 GB RAM आणि 128 GB स्टोरेज पर्याय दिलेले असतील. याशिवाय हा फोन Android 11 आधारित MIUI 12.5 वर काम करेल अशी अपेक्षा केली जात आहे. याशीवाय FCC लिस्टींगमध्ये देखील हा फोन 4G कनेक्टिव्हिटीसह येईल अशी माहिती देण्यात आली आहे. याशिवाय या फोनशी संबंधित अन्य कोणतीही माहिती सध्या समोर आलेली नाही.

Redmi Note 11T 5G
रेडमीचा 5G फोन भारतात लॉंच; स्वस्तात मिळतायेत भन्नाट फीचर्स

जुन्या रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, रेडमीचा हा फोन अनेक वेबसाईट्सवर स्पॉट केला गेला आहे, Redmi चा हा स्मार्टफोन युरेशियन इकॉनॉमिक कमिशन (EEC) सर्टिफिकेशन लिस्टींग, IMDA, TKDN, SDPPI आणि TUV Rheinland सर्टिफिकेशन साइट्ससह अनेक वेबसाइट्सवर स्पॉट झाला आहे. हा फोन याआधी IMEI डेटाबेसवर देखील स्पॉट झाला आहे.

आगामी Redmi 10 (2022) स्मार्टफोनमध्ये या वर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च झालेल्या Redmi 10 प्रमाणेच फीचर्स असल्याचे सांगितले जाते.

Redmi Note 11T 5G
पेटीएमवर खरेदी करा डिजीटल गोल्ड; ही आहे सोपी प्रोसेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com