5G Phone Under Rs 15000 : रेडमीने कमी केली 5G फोनची किंमत; मिळते 5000mAh बॅटरी अन् 128GB स्टोरेज

redmi 11 prime 5g price slashed in india  check specifications 5g phone under 15000 rupees
redmi 11 prime 5g price slashed in india check specifications 5g phone under 15000 rupees

Redmi 11 Prime 5G : Redmi ने भारतात आपल्या 5G स्मार्टफोन Redmi 11 Prime 5G ची किंमत कमी केली आहे. Redmi 11 Prime 5G देशात सप्टेंबर 2022 मध्ये 13,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. आता या फोनची किंमत 1000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. हँडसेटच्या नवीन किंमती आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊयात..

Redmi 11 Prime 5G च्या किमतीत घट

1000 रुपयांच्या कपातीनंतर, Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनचा 4 GB रॅम आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेज 12,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याच वेळी, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आता 14,999 रुपये आहे. नवीन किंमतींसह, फोन Amazon India आणि Xiaomi च्या वेबसाइटवर लिस्टेड झाला आहे. याशिवाय, Amazon India वरून ICICI बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 1000 रुपयांची सूट देखील मिळेल.

हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

Redmi 11 प्राइम 5G चे स्पेसिफिकेशन्स

Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा डिस्प्ले आहे जो फुलएचडी+ 2408×1080 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे. सुरक्षेसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आला आहे. Redmi चा हा बजेट फोन MediaTek Dimensity 700 चिपसेट सह येतो. हँडसेटमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते.

redmi 11 prime 5g price slashed in india  check specifications 5g phone under 15000 rupees
"2500 किमी चालूनही…"; दिल्लीच्या थंडीत T-Shirtवरील राहुल गांधींचा फोटो NCP नेत्याने केला शेअर

रेडमी 11 प्राइममध्ये Android 12 आधारित MIUI 13 देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सल प्राइमरी, 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये अपर्चर F/2.2 सह 8-मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर देखील आहे.

redmi 11 prime 5g price slashed in india  check specifications 5g phone under 15000 rupees
Pune News : पुण्यात बाइक टॅक्सी कंपनी 'रॅपीडो' विरोधात गुन्हा दाखल

या Redmi हँडसेटमध्ये पॉवरसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन ड्युअल-सिमला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, 3.5 मिमी हेडफोन जॅक, फिंगरप्रिंट सेन्सर, एआय फेस अनलॉक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, Redmi 11 Prime मध्ये Wi-Fi आणि Bluetooth 5.1 सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. Redmi ने अलीकडेच Android 12 सह फोन लॉन्च केला आहे आणि लवकरच अपडेट मिळण्याची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com