सात हजारापेक्षा कमी किंमतीचा Redmi 8A झाला लॉंन्च ; जाणून घ्या काय आहेत फिचर्स

वृत्तसंस्था
Saturday, 28 September 2019

Xiaomi कंपनीने भारतात बुधवारी (24 सप्टेंबर) रेडमी 8A लॉंन्च केला आहे.

मुंबई : Xiaomi कंपनी मोठं नेटवर्क असणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. नुकतच या कंपनीने भारतात बुधवारी (24 सप्टेंबर) रेडमी 8A लॉंन्च केला आहे. सात हजारपेक्षा कमी किंमत असणारा हा फोन एक बजेट फोन असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. या बजेटमध्ये मिळणारा हा सर्वात उत्तम फोन आहे असा दावा शियोमी कंपनीने केला आहे. 

रेडमी 8 ए आज शाओमी इंडियाच्या युट्यूब चॅनेलवरून दुपारी 12 वाजता लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे लाँच करण्यात आला. रेडमी 8 A किंमतीच्या तुलनेत फोनमध्ये अनेक चांगले फिचर आहेत. फोनला 5000 एमएच ची दमदार बॅटरी आहे आणि यूएसबी 'टाइप सी' चा पोर्ट दिला आहे. कमी किंमतीमध्ये सी पोर्ट देणारा हा पहिलाच फोन असेल. कंपनीने रेडमी 8 A फोनला दोन वेरिएंटमध्ये बाजारात आणलं आहे. त्यामध्ये 32 जीबी स्टोरेज आणि 2 जीबी रॅम असलेला फोन 6 हजार 499 रुपयांना तर 32 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅम असेलेला फोन 6 हजार 999 रुपयांना मिळेल. 

फोनला 6.22 इंची लांब एचडी प्लस डॉट नॉट डिस्प्ले देण्यात आलाय. शिवाय फेसअनलॉक फिचरदेखील असणार आहे. सेल्फीच्या चाहत्यांसाठी या स्मार्टफोनला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तर पोर्ट्रेट मोड आणि  एआई सीन डिटेक्शन असे फिचरदेखील देण्यात आले आहेत. फोनसोबत 3.5 एमएम चे हेडफोनही मिळणार आहेत. हा फोन Midnight Black, Ocean Blue आणि Sunset Red अशा तिन रंगामध्ये उपलब्ध असेल. हॅंडसेट 30 सप्टेंबरपासून MI स्टोअरमध्ये उपलब्ध होईल. तर फ्लिपकार्ट आणि Mi.com वर एक दिवस आधी म्हणजेच 29 सप्टेंबरला तो मिळणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Redmi 8A launched in India with price starting at Rs 6499