esakal | लवकरच येतोय Redmi Note 11, मिळणार 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट, पाहा डिटेल्स
sakal

बोलून बातमी शोधा

Redmi Note 11

लवकरच येतोय Redmi Note 11, मिळणार 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Redmi Note 10 सीरीज ही भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी स्मार्टफोन सीरिज आहे, कंपनी कडून दरवर्षी यामध्ये अपडेट करण्यात येते. दरम्यान सध्या Redmi Note सीरीज वापरकर्ते नवीन सीरीज अपडेट Redmi Note 11 ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Redmi Note 11 फीचर्स काय असतील?

टिप्स्टर डिजिटल चॅट स्टेशनच्या रिपोर्टनुसार, रेडमी नोट 11 सीरीज ही 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल - हे फीचर जे भारतातील सर्वात प्रीमियम झिओमी स्मार्टफोनमध्ये देखील देण्यात आलेले नाही. मात्र 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट फक्त Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro Max व्हेरियंटसाठी रिझर्व्ह असेल.

आत्तापर्यंत Xiaomi Xiaomi 11T Pro आणि Xiaomi MIX 4 वर 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. हे दोन्ही स्मार्टफोन भारतात लॉंच करण्यात आले नव्हते. हे डिव्हाईश भारतात कधी लॉन्च केले जातील की नाही याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे Mi 11 Ultra 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो पण रिटेल बॉक्समध्ये तो 55W फास्ट चार्जरसह येतो. दरम्यान, रेडमी नोट 10 सीरीज इतर शाओमी स्मार्टफोनप्रमाणेच 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

हेही वाचा: MG Astor भारतात लाँच, किंमत Hyundai Creta पेक्षा कमी

Redmi Note 11 चे लीक स्पेसिफिकेशन्स

यापूर्वी, Redmi Note 11 सीरीजचे काही फोटो देखील लीक झाली होते, ज्यामध्ये लाइन-अप फूल-स्क्रीन डिस्प्लेसह फ्रंट कॅमेरासाठी होल पंच कटआउटसह येईल. मागील पॅनेलवर देखील काही बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये एक स्क्वेअर-ऑफ कॅमेरा मॉड्यूल देखील असेल. पॉवर आणि व्हॉल्यूम की डिव्हाइसच्या उजव्या बाजूला देण्यात आल्या आहेत आणि सिम-ट्रे डावीकडे दिला आहे.

हेही वाचा: बाईक इतके मायलेज देतात 'या' सीएनजी कार, पाहा किंमत आणि फिचर्स

loading image
go to top