रेडमीचा रेकॉर्ड ब्रेकिंग सेल! फक्त 1 मिनिटात विकले 330 कोटींचे फोन

redmi sold 330 crore rupees worth redmi k50 smartphone within just 1 minute in first sale
redmi sold 330 crore rupees worth redmi k50 smartphone within just 1 minute in first sale

Redmi K50 गेमिंग एडिशन काही दिवसांपूर्वीच लॉन्च झाला आहे. पण आज Redmi K50 स्मार्टफोन पहिल्यांदाच चीनमध्ये सेलसाठी उपलब्ध करून देण्यात आला आणि या सेलमध्ये फोनला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. Gizmo चायना च्या रिपोर्टनुसार Redmi K50 गेमिंग एडिशनच्या पहिल्या सेलमध्ये कंपनीने फक्त एका मिनिटात 280 मिलियन युआन (330 कोटी) ची कमाई केली आहे. चला या फोनच्या किंमती आणि फीचर्स संबंधित डिटेल्स जाणून घेऊया..

Redmi K50 गेमिंग एडिशनची किंमत

Redmi K50 Gaming Edition च्या 128GB स्टोरेज + 8GB रॅम असलेल्या Redmi K50 गेमिंग एडिशन स्मार्टफोनची किंमत 3,299 युआन (अंदाजे रु 38,935) आहे, तर 128GB स्टोरेज + 12GB रॅम फोनची किंमत 3,599 युआन (अंदाजे, 44274 रुपये) इतकी आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि सिल्व्हर कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

redmi sold 330 crore rupees worth redmi k50 smartphone within just 1 minute in first sale
रेडमीचे Note 11S, Note 11 भारतात लॉंच, वाचा किंमत-फीचर्ससह सर्वकाही

Redmi K50 गेमिंग एडिशनची फिचर आणि स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये कंपनी 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये आढळणारा हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश आणि 480Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. डिस्प्लेमेट A+ रेटिंग देण्यात आली आहे, या फोनमध्ये डिस्प्ले सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देखील देण्यात आला आहे. 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह, या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून IO Turbo सह Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्हाला 4860mm स्क्वेअर हीट डिसिपेशन एरियासह ड्युअल व्हीसी कूलिंग देखील मिळेल.

redmi sold 330 crore rupees worth redmi k50 smartphone within just 1 minute in first sale
आलिया भट्टने चाहत्यांना दिलं गंगूबाई चॅलेंज, तुम्हीही करा ट्राय..

फोटोग्राफीसाठी हँडसेटमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64-मेगापिक्सेल प्राइमरी लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटर दिला आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यात उपलब्ध असेल. स्मार्टफोनला 4700mAh बॅटरी आहे जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी 17 मिनिटांत फोन शून्य ते 100% चार्ज करू शकते.

redmi sold 330 crore rupees worth redmi k50 smartphone within just 1 minute in first sale
Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटर, आता 'या' शहरात देखील होणार विक्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com