जिओचे लेटेस्ट रिचार्ज प्लॅन्स! मिळतो हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग अन् बरंच

reliance jio 2.5 gb daily data plan rupees 2023 899 349 plan unlimited voice all check details
reliance jio 2.5 gb daily data plan rupees 2023 899 349 plan unlimited voice all check details

Jio 2.5 GB Daily Recharge Plan : रिलायन्स जिओ ने नुकतेच रु 899 आणि रु 349 चे दोन नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. जिओने 2023 च्या सुरुवातीला ग्राहकांसाठी 2023 रुपयांचा रिचार्ज पॅक देखील लॉन्च केला होता.

विशेष बाब म्हणजे या तीन लेटेस्ट रिलायन्स जिओ प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा दिला जात आहे. हे प्लॅन्स ज्या ग्राहकांना दररोज अधिक डेटाची आवश्यकता असते त्यांना लक्षात घेऊन लॉन्च केले आहे. हे तिन्ही प्लॅन अमर्यादित व्हॉईस कॉल देतात. रिलायन्स जिओच्या या नवीन प्रीपेड रिचार्जबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...

जिओचा 2023 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 2023 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता 252 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण 630 GB डेटा वापरू शकतात.

दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत कमी होतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. म्हणजेच जिओचे ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा लाभ घेऊ शकतात.

याशिवाय रिलायन्स जिओच्या या लेटेस्ट प्लॅनमध्ये दररोज 100SMS देखील ऑफर केले जातात. Jio च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

reliance jio 2.5 gb daily data plan rupees 2023 899 349 plan unlimited voice all check details
Shafali Verma : धोनीनंतर शेफालीच! कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं

रिलायन्स जिओचा 899 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 899 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता ९० दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 2.5 GB डेटा देण्यात आला आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण 225 जीबी डेटा वापरू शकतात. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत कमी होतो. 5G वापरणारे ग्राहक या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G नेटवर्कचा आनंद घेऊ शकतात.

कंपनी या प्लॅनमध्ये Jio ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर करते. म्हणजेच, देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल मोफत आहेत. Jio चा हा प्लॅन JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील मोफत आहेत.

reliance jio 2.5 gb daily data plan rupees 2023 899 349 plan unlimited voice all check details
Nashik News : नाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांची तीन खोल्यांमध्ये आत्महत्या

रिलायन्स जिओचा 349 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2.5 GB डेटा मिळतो, म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण 75 GB डेटाचा लाभ घेऊ शकतात. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड 64Kbps पर्यंत कमी होते.

रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स उपलब्ध आहेत. या रिचार्ज पॅकमध्ये कंपनी दररोज 100 एसएमएस ऑफर करते. या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioCloud आणि JioSecurity सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. 5G नेटवर्क वापरणारे जिओ ग्राहक रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटाचा लाभही घेऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com