Jio Prepaid Plan : जिओचे 5 नवीन रिचार्ज प्लॅन, स्वस्तात मिळतोय 46GB पर्यंत डेटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jio

जिओचे 5 नवीन रिचार्ज प्लॅन, स्वस्तात मिळतोय 46GB पर्यंत डेटा

Jio Prepaid Plan : रिलायन्स जिओने गेल्या महिन्यातच आपले रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. याशिवाय Jio ने काही नवीन प्लॅन देखील लॉन्च केले आहेत. टेलिकॉम कंपन्या 28 दिवस, 56 दिवस, 84 दिवस, 336 दिवस आणि 365 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन देत आहेत. आता जिओने काही खास अनलिमिटेड प्लॅन आणले आहेत, जे वैधतेच्या बाबतीत वेगळे आहेत. चला तर मग जाणून घेऊया जिओचे हे प्लॅन काय आहेत आणि त्यात काय फायदे देण्यात येत आहेत.

20 दिवस आणि 24 दिवस वैधता

रिलायन्स जिओचा एक प्लॅन 149 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये 20 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. याशिवाय जिओचा 179 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 24 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. जिओच्या या दोन्ही प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा दिला जातो. म्हणजेच, या प्लॅनमध्ये एकूण अनुक्रमे 20GB आणि 24GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते.

रिलायन्स जिओच्या 14 दिवस आणि 23 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन 119 रुपयांचा आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये 14 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 23 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. जिओच्या या दोन्ही प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच, या प्लॅनमध्ये एकूण अनुक्रमे 21GB आणि 34.5GB डेटा आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग तसेच, दोन्ही प्लॅन्स दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देतात. Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये मोफत उपलब्ध आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रात इलेक्ट्रिक कार खरेदीवर 2.5 लाखांची सूट; पाहा डिटेल्स

23 दिवस चालणारा प्लॅन

रिलायन्स जिओचा हा प्लॅन 249 रुपयांचा आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये 23 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला मिळतो म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 46GB डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

हेही वाचा: Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jio
loading image
go to top