Jio AirFiber : जिओ एअर फायबर धमाक्यात झालं लाँच! अवघ्या 599 रुपयांपासून सुरू होणार प्लॅन; मिळणार जबरदस्त स्पीड

Reliance Jio : गणेश चतुर्थीचं औचित्य साधून रिलायन्सने हे डिव्हाईस लाँच केलं आहे.
Jio AirFiber Plans Price
Jio AirFiber Plans PriceeSakal
Updated on

रिलायन्स जिओने गणेश चतुर्थीचं औचित्य साधून जिओ एअर फायबर लाँच केलं आहे. यामध्ये यूजर्सना 1 GBPS एवढा जबरदस्त स्पीड मिळणार आहे. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी याची 28 ऑगस्टला घोषणा केली होती. तेव्हापासूनच यूजर्स याची प्रतिक्षा करत होते.

जिओचं हे नवं हॉटस्पॉट डिव्हाईस आहे. याच्या मदतीने घरात किंवा ऑफिसमध्ये वायरसेल 5G इंटरनेट मिळणं शक्य होणार आहे. हे एक प्लग अँड प्ले डिव्हाईस आहे. इतर इंटरनेट राउटर प्रमाणेच हे यूज करता येईल. अर्थात, हे पूर्णपणे वायरलेस असणार आहे.

Jio AirFiber Plans Price
Jio Financial Stock: मुकेश अंबानींच्या जिओ फायनान्स कंपनीसाठी बीएसईने बदलले नियम, आज शेअर्समध्ये तेजी

599 रुपयांचा बेसिक प्लान

रिलायन्स जिओ एअर फायबर सेटअप करण्यासाठी यूजर्सना जिओच्या अ‍ॅपची गरज भासणार आहे. हे डिव्हाईस 100 स्क्वेअर फूट एरियामध्ये हाय स्पीड वायरलेस इंटरनेट देईल. याचा बेसिक प्लॅन 599 रुपयांपासून सुरू होणार आहे. तर यातील सगळ्यात महागडा प्लॅन 3,999 रुपयांचा आहे.

काय आहेत फीचर्स?

जिओ एअर फायबरमध्ये 1Gbps पर्यंतचा टॉप इंटरनेट स्पीड, अनलिमिटेड डेटा आणि काही ओटीटी प्लॅन्सचं सबस्क्रिप्शन मिळतं. 599 रुपयांच्या बेसिक प्लॅनमध्ये 30 Mbps टॉप स्पीड मिळतो. तसंच, अनलिमिटेड डेटा डिज्नी+ हॉटस्टार, सोनी लिव्ह आणि झी5 यांसह 11 ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळतो. हा एअर फायबर प्लॅन सहा किंवा 12 महिन्यांसाठी घेऊ शकता.

Jio AirFiber Plans Price
Jio Financial Services: अंबानींनी गुंतवणूकदारांना केले मालामाल! जिओ फायनान्शियलच्या शेअर्समध्ये तुफान तेजी

किती आहे किंमत?

जिओ एअर फायबरची किंमत अद्याप कंपनीने घोषित केलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार याची किंमत सुमारे सहा हजार रुपये असण्याची शक्यता आहे. हे सध्या मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई आणि पुणे या शहरांमध्ये लाँच करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com