Jio Prepaid Plans : जिओचे सर्वात स्वस्त प्लॅन; दररोज मिळतो 2GB डेटा, अमर्यादित कॉल्स अन् बरंच

reliance jio cheapest 2gb daily data plan under 300 rupees  jio affordable prepaid plans
reliance jio cheapest 2gb daily data plan under 300 rupees jio affordable prepaid plans

रिलायन्स जिओकडे दररोज 2GB डेटा ऑफर करणारे 5 प्रीपेड प्लॅन आहेत. जर जिओ ग्राहकांना 2 जीबी डेटा देणार परवडणारा प्लॅन हवा असेल तर त्यांना अनेक रिचार्ज प्लॅन ऑप्शन्स मिळतील.

जिओचे हे प्लॅन 249 रुपयांपासून सुरू होतात. दररोज 2 जीबी डेटा ऑफर करणार्‍या जिओच्या सर्वात महागड्या प्लॅनची ​​किंमत 2,879 रुपये आहे. या सर्व प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स देण्यात येत आहेत. आज आपण जिओच्‍या 300 रुपयांपेक्षा कमीच्‍या प्‍लॅनबद्दल जाणून घेणार आहोत जे दररोज 2 GB डेटा देतात.

reliance jio cheapest 2gb daily data plan under 300 rupees  jio affordable prepaid plans
OnePlus 11 स्मार्टफोन लॉन्च! मिळतो दमदार प्रोसेसर अन् कॅमेरा, जाणून घ्या किंमत

रिलायन्स जिओचा 299 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 299 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच, ग्राहक एकूण 56 GB हाय-स्पीड 4G डेटाचा लाभ घेऊ शकतात.

रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्सची ऑफर देण्यात आली आहे. जिओचे ग्राहक देशभरात स्थानिक, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा आनंद घेऊ शकतात. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात.

रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये JioTV, Jio Cinema, JioSecurity, JioCloud चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. 5G वापरणाऱ्या ग्राहकांना या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा दिला जातो.

reliance jio cheapest 2gb daily data plan under 300 rupees  jio affordable prepaid plans
धनंजय मुंडेंच्या तब्येतीवर अजित पवारांकडून अपडेट; 'त्या' गोष्टीचा पुर्नउच्चार करत म्हणाले…

249 रुपयांचा रिलायन्स जिओ प्लॅन

रिलायन्स जिओच्या या प्लॅनची वैधता 23 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहक एकूण 46 जीबी डेटा घेऊ शकतात.

या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. या रिचार्ज प्लॅनमध्ये देशभरात लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल मोफत उपलब्ध आहेत. यासोबतच दररोज 100 एसएमएसचाही लाभ मिळणार आहे.

या प्लॅनमध्ये रिलायन्स जिओ ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचा मोफत एक्सेस मिळू शकतो. जे ग्राहक 5G नेटवर्क वापरत आहेत त्यांना या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा मिळेल.

reliance jio cheapest 2gb daily data plan under 300 rupees  jio affordable prepaid plans
Sharad Pawar : एकनिष्ठतेचं बाळकडू आईकडूनच! पवारांनी काँग्रेससाठी भावाविरोधात केला होता प्रचार

याशिवाय रिलायन्स जिओचे 2,879 रुपये, 719 रुपये आणि 533 रुपयांचे प्लॅन देखील आहेत, ज्यामध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. या सर्व प्लॅनमध्ये दररोज अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com