
नवी दिल्लीः रिलायन्स जिओने 4G फोन 'जियो भारत V2' लाँच केला आहे. अत्यंत स्वस्त दरामध्ये ग्राहकांना हा मोबाईल फोन खरेदी करता येणार आहे. कारण याची किंमत फक्त ९९९ रुपये इतकी आहे.
जिओ कंपनीचं लक्ष्य भारतातल्या २५ कोटी २जी ग्राहकांवर आहे. जे ग्राहक सध्या एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या कंपन्यांशी जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी जिओने ही स्किम आणलीय. रिलायन्सचा दावा आहे की, 'जिओ भारत व्ही २'च्या माध्यमातून कंपनी १० कोटींपेक्षा जास्त ग्राहक जोडेल.
'Jio Bharat V2' ची किंमत बाजारात उपलब्ध असलेल्या इंटरनेट फोनपेक्षा सर्वात कमी आहे. 999 रुपयांमध्ये उपलब्ध 'Jio Bharat V2' चा मासिक प्लॅन देखील सर्वात स्वस्त आहे. 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 123 रुपये द्यावे लागणार आहेत.
सदरील मोबाईल देशात बनवलेला आणि फक्त 71 ग्रॅम वजनाचा आहे. 'Jio Bharat V2' 4G इंटरनेत सेवेवर काम करतो. यात HD व्हॉईस कॉलिंग, FM रेडिओ, 128 GB SD मेमरी कार्ड सपोर्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत. मोबाईलमध्ये 1.77 इंच TFT स्क्रीन, 0.3 मेगापिक्सेल कॅमेरा, 1000 mAh बॅटरी, 3.5 mm हेडफोन जॅक, शक्तिशाली लाऊडस्पीकर आणि टॉर्च आहे.
Jio Bharat V2 मोबाईलमध्ये ग्राहकांना Jio-Saavn मधील 80 दशलक्ष गाण्यांचा आनंद घेता येईल. तसेच Jio सिनेमाचे सबस्क्रिप्शनही मिळे. ग्राहक Jio-Pay द्वारे UPI वर व्यवहार देखील करू शकतील. भारतातील प्रमुख भाषा यामध्ये समाविष्ट असणार आहेत. हा मोबाईल 22 भारतीय भाषांमध्ये काम करू शकतो, असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.