दुबईमध्ये "रोबोकॉप' 

पीटीआय
शुक्रवार, 2 जून 2017

दुबई : गस्त घालण्यासाठी पोलिसांना फेरारी आणि लॅम्बॉर्घिनी यासारख्या महागड्या गाड्या देणाऱ्या दुबई पोलिस प्रशासनाने जगातील पहिला रोबो पोलिस रस्त्यावर तैनात केला आहे.

दुबई : गस्त घालण्यासाठी पोलिसांना फेरारी आणि लॅम्बॉर्घिनी यासारख्या महागड्या गाड्या देणाऱ्या दुबई पोलिस प्रशासनाने जगातील पहिला रोबो पोलिस रस्त्यावर तैनात केला आहे. जगातील सर्वाधिक उंच इमारत असलेल्या बुर्झ खलिफाच्या प्रवेशद्वारापाशी हा रोबो पोलिस सध्या कर्तव्य बजावत आहे. 

येथील पोलिसांसारखाच गणवेश परिधान केलेला हा "रोबोकॉप' चाकांच्या साह्याने हालचाल करतो. त्याच्या छातीवर टचस्क्रीन असून त्यावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता तसेच इतर काही माहितीही मिळवू शकता. पोलिस दलामध्ये या रोबोंची संख्या 25 टक्‍क्‍यांपर्यंत नेण्याचा येथील सरकारचा उद्देश आहे. हे रोबो प्रामुख्याने पर्यटनस्थळांवर तैनात केले जाणार आहेत. या रोबोमध्ये कॅमेरा असल्याने ते नियंत्रण कक्षाला थेट प्रक्षेपण आणि छायाचित्रे पाठवू शकतात. त्यामुळे संशयित व्यक्तींचा शोध घेणे पोलिसांना सोपे जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. अर्थात, या रोबोला अद्याप खूप मर्यादा असल्याने गुन्हेगारांना पकडण्याचे काम तो सध्या करू शकत नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robocop officer joins Dubai police