esakal | आता रोबोट करणार प्रत्येक रेल्वे डबा निर्जंतुक
sakal

बोलून बातमी शोधा

आता रोबोट करणार प्रत्येक रेल्वे डबा निर्जंतुक

आता रोबोट करणार प्रत्येक रेल्वे डबा निर्जंतुक

sakal_logo
By
टीम इसकाळ

- शिल्पा गुजर

कोरोनाला आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वे, प्रवासादरम्यान प्रत्येक पाऊल खबरदारीने घेण्याचा प्रयत्न करते आहे. सणासुदीच्या काळात आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी नवी शक्कल लढवण्यात आली आहे. यूव्हीसी लाइटचा वापर निर्जंतुकीकरण करण्यासाठी केला जाऊ लागला आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यासाठी रोबोटचा वापर केला जात आहे जेणेकरून स्वच्छता करताना मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि कोरोनाचा प्रसार रोखता येईल.

या ट्रेनमधून सुरू झाला प्रयोग

दिल्ली विभागाने तंत्रज्ञान संचालित निर्जंतुकीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. हा रोबो पॅसेंजर गाड्यांमध्ये, UVC लाईटचा वापर करून डबे 100% स्वच्छ आणि निर्जंतुक करतो. अतिनील (ultraviolet) किरणांसह UVC लाईट कंपार्टमेंटमधील प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या ठिकाणांना पूर्णपणे निर्जंतुक करतो. ट्रेन क्रमांक 02004 नवी दिल्ली-लखनौ शताब्दी एक्सप्रेसमध्ये पहिल्यांदा या यूव्हीसी लाइट रोबोटच्या मदतीने निर्जंतुकीकरण केले आहे.

हेही वाचा: येलो ब्लाउज, मल्टीकलर ऑर्गेंजा साडी: दिपिकाचा Classy Look पाहिला का?

रोबो अत्यंत उपयुक्त

कोच पूर्णपणे निर्जंतुक करण्यासाठी रोबोट्स वापरण्याची कल्पना एक वर्षापूर्वी सुरू झाली होती. यासाठी रायपूर विभागाने यूव्हीसी लाइटने सुसज्ज रोबो तयार केला आहे. एसी डब्यांमध्ये हे रोबोट अतिशय उपयुक्त आहेत कारण व्हेंटीलेशनसाठी खिडक्या उघड्या नसतात. या रोबोंचा वापर केवळ डब्यांसाठीच नव्हे तर संसर्ग होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी देखील करत आहेत.

प्रवास सुरक्षित करण्याचा मुख्य उद्देश

कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान, संसर्ग रोखण्यासाठी रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून रेल्वे, सुरक्षित प्रवास करण्यासाठी उपाययोजना करत आहे. त्यामुळेच आता UVC रोबोटसह स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची एक अनोखी पद्धत दिल्ली विभागातून सुरू करण्यात आली आहे.

loading image
go to top