Royal Enfield Hunter 350 : किंमत कमी अन् फीचर्स दमदार, जाणून घ्या खासीयत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Royal Enfield Hunter 350 know about its features and all details

Royal Enfield Hunter 350 : किंमत कमी अन् फीचर्स दमदार, जाणून घ्या खासीयत

Royal Enfield Hunter 350 ने भारतीय बाजारपेठेत लॉंच झाली. त्याचबरोबर कंपनीने त्याचे बुकिंगही सुरू केले आहे. तुम्हाला ही बाईक घ्यायची असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशिपवर जाऊन ती बुक करू शकता. नवीन हंटर 350, Meteor 350 सारख्याच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. Royal Enfield Hunter 350 बद्दल पाच खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

रॉयल एनफील्ड हंटर 350

नवीन रॉयल एनफिल्ड हंटर 350 मध्ये गोलाकार रीअर-व्ह्यू मिरर, 13-लीटर टीयर-ड्रॉप-आकाराचे फ्युल टँक, ट्रिपल नेव्हिगेशन सिस्टमसह माउंटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एक ऑप्शन म्हणून मिळतो. यात 800 मिमी उंच सिंगल-पीस सीट आणि कॉम्पॅक्ट एक्झॉस्ट कॅनिस्टर देखील मिळते. यासोबतच कंपनीने त्यात ऑप्शन अॅक्सेसरीज दिल्या आहेत. जेणेकरुन या बाईकला अगदी आधुनिक आणि आरामदायी बनते. यामध्ये फ्लायस्क्रीन, बार-एंड मिरर, फ्लॅट सीट, साइड पॅनियर्स, पिलियन बॅकरेस्ट आणि इंजिन क्रॅश प्रोजेक्टर यांचा समावेश आहे.

Royal Enfield Hunter 350 चे व्हेरिएंट

या बाईकचे मेट्रो आणि रेट्रो असे दोन व्हेरिएंट आहेत. मेट्रो व्हेरियंट अलॉय व्हीलवर आधारित आहे, सोबत डबल डिस्क सेटअप, एलईडी टेललाइट आणि सिंगल चॅनेल एबीएस मिळते. तर मेट्रो व्हेरियंटला ड्युअल-टोन फिनिश मिळतो, तर रेट्रो व्हेरियंटला ड्युअल-टोन फिनिश मिळतो. रेट्रो व्हेरिएंटमध्ये सिंगल टोन पेंट थीम आहे.

हेही वाचा: Royal Enfield ने भारतात लाँच केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत

रॉयल एनफील्ड हंटर 350 इंजिन

Meteor 350 प्रमाणेच, नवीन Royal Enfield Hunter 350 मध्ये 349cc आणि सिंगल-सिलेंडर, टू-व्हॉल्व्ह, SOHC, एअर/ऑइल-कूल्ड इंजिन आहे. पाच-स्पीड गिअरबॉक्ससह मोटर 6,100rpm वर 20.2bhp आणि 4,000rpm वर 27Nm पीक टॉर्क जनरेट करते.

रॉयल एनफील्ड हंटर 350 फीचर्स

नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये हॅलोजन हेडलाइट आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये अॅनालॉग स्पीडोमीटरसह फ्लोटिंग एलसीडी आहे. सेटअप डिजिटल ओडोमीटर, गियर पोझिशन इंडिकेटर, दोन ट्रिप मीटर, लो फ्युअल ट्रिप मीटर, इंधन गेज, इको इंडिकेटर, सर्व्हिस रिमाइंडर देखील आहे. यासोबतच ट्रिपल नेव्हिगेशन सिस्टीम पर्यायी म्हणून उपलब्ध असेल.

हेही वाचा: Motorola Moto G62 : भारतात 11 ऑगस्टला होणार लाँच, जाणून घ्या सर्व काही

टॅग्स :Technology