नवीन बाईक घ्यायचीये? थोडी वाट पाहा; २०२३ मध्ये Royal Enfield च्या ५ स्वस्त दुचाकींंची होणार एंट्री | Upcoming Bike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Royal Enfield

Upcoming Bike: नवीन बाईक घ्यायचीये? थोडी वाट पाहा; २०२३ मध्ये Royal Enfield च्या ५ स्वस्त दुचाकींंची होणार एंट्री

Royal Enfield Upcoming Bikes: Royal Enfield च्या बाईक्सला भारतीय ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो. कंपनीने वर्ष २०२२ मध्ये अनेक शानदार बाईक्सला लाँच केले आहे. कंपनी पुढील वर्षी देखील एकापेक्षा एक शानदार बाईक्सला लाँच करणार आहे. तुम्ही जर रॉयल एनफील्डची नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काहीदिवस वाट पाहणे फायद्याचे ठरेल. Royal Enfield वर्ष २०२३ मध्ये कोणत्या नवीन बाईक्स लाँच करणार आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Super Meteor 650

Super Meteor 650

Super Meteor 650

Royal Enfield या बाईकला जानेवारी २०२३ मध्ये लाँच करणार आहे. याआधी Royal Enfield Super Meteor 650 ला EICMA 2022 मध्ये सादर करण्यात आले होते. यात ६५०cc चे एअर आणि ऑइल कूल्ड मोटर मिळेल. हे इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्ससह येईल.

New-gen Bullet 350

न्यू जनरेशन Royal Enfield Bullet 350 एप्रिल २०२३ मध्ये लाँच होईल. यात ३४९cc चे सिंगल सिलेंडर, एअर आणि ऑइल कूल्ड इंजिन मिळेल. लाँच झाल्यावर ही कंपनीची भारतातील सर्वात स्वस्त बाईक असेल.

हेही वाचा: Used Cars: जुनी गाडी विकायचीये? 'या' महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्यास मिळतील दुप्पट पैसे

Continental GT 650

Continental GT 650

नवीन Continental GT 650

कंपनी या बाईकला नोव्हेंबर २०२३ मध्ये लाँच करेल. नवीन मॉडेलमध्ये काही अपडेट्स देखील पाहायला मिळतील. कंपनी Royal Enfield Interceptor 650 चे अपडेट मॉडेल देखील लाँच करू शकते.

Himalayan 450

Royal Enfield Himalayan ला भारतीय ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता कंपनी Himalayan 450 ला लाँच करणार आहे. समोर आलेल्या फोटोवरून लक्षात येते की, यामध्ये यूएसडी फ्रंट फोर्क, रियरला एक मोनो-शॉक् एब्सोर्बर, २१ इंच आणि १८ इंच वायर स्पॉक व्हील्स आणि ४० बीएचपी पॉवर आउटपूट मिळेल.

Shotgun 650

Shotgun 650

Shotgun 650

रॉयल एनफील्ड या बाईकला वर्ष २०२४ च्या सुरुवातीला लाँच करण्याची शक्यता आहे. बाईकला सर्वात प्रथम EICMA 2021 मध्ये सादर करण्यात आले आहे. यात Super Meteor 650 प्रमाणेच पॉवरट्रेन असेल. ही भारतात विक्री होणार सर्वात महागडी बाईक ठरू शकते. दरम्यान, कंपनी इतरही लाइनअपवर काम करत आहे. लाँचनंतरच या सर्व मॉडेलची किंमत समजू शकेल.

टॅग्स :BikesBikeAutomobile