उद्यानामधील चालणारे, नाचणारे दिवे!

वृत्तसंस्था
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

जपानमधील उद्याने नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण असतात. या देशामध्ये सध्या उद्यानांमधील रोबोटिक दिव्यांची चर्चा आहे! या दिव्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे दिवे चालणारे किंवा नाचणारेही असू शकतात! या दिव्यांच्या जवळून कोणी गेल्यास हे दिवे त्या व्यक्तीचा चक्क पाठलाग करतात! त्यामुळे रात्री बागेत फिरताना तुम्ही अंधाऱ्या रस्त्यावर पोचल्यावर ते तुम्हाला प्रकाश देतील.

जपानमधील अलव्हॅरो कॅ सिनेल या आर्टिस्टने "फॅंटॉमएक्‍स क्वार्डा पेड्‌स' हे जपानी प्रकारचे दिवे वापरून "टोरो-बोटस्‌' बनवले आहेत. टोकियोतील फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर येथे भरलेल्या "जनरेटिव्ह गार्डन' प्रदर्शनासाठी कॅसिनेलयांनी हे टोरो-बोटस' तयार के ले होते. हे दिवे एकत्रितपणे किंवा स्वतंत्रपणे आयपॅड वापरून नियंत्रित करता येऊ शकतात. या प्रत्येक दिव्याला वेगळे "व्यक्तिमत्त्व' आहे.

इन्फ्रारेड रेंजफाईंडर्सच्या मदतीने ते आजूबाजूच्या परिस्थितीचा अर्थ लावू शकतात. याबाबत बोलताना कॅसिनेल म्हणाले,""पारंपरिक जपानी बागा नैसर्गिक सौंदर्य मांडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आम्ही अशी उद्याने तयार करीत आहोत, जी स्वतःची काळजी स्वतः घेतील. मानवी निरीक्षक असताना किंवा नसताना ऋतूनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतील.''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In running, dancing lights in the park!