टेक्नोहंट : कल्पनेपलीकडील ‘अल्टर इगो’

कोरोनामुळे सर्वच गोष्टींचा पॅटर्न बदलला, त्याला रिॲलिटी शोज् देखील अपवाद नव्हते. प्रेक्षकांविना आणि केवळ परीक्षकांच्या उपस्थितीच शोज् घेण्यात आले.
Alter Ego
Alter EgoSakal
Updated on

आतापर्यंत आपण गायनाचे अनेक रिॲलिटी किंवा लाइव्ह शोज् बघितले असतील. कोरोनाकाळात त्याची जागा व्हर्च्युअल कार्यक्रमांनी घेतली. मात्र, आता गायकांना कॉन्सर्टच्या ठिकाणी न येताही परफॉर्म करता येणार आहे. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये नवं काय? आता मंचावर गायकाऐवजी त्याचा आभासी अवतार गाणं गाणार आहे! ‘फॉक्स टीव्ही’च्या ‘अल्टर इगो’ या रिॲलिटी शोमध्ये याप्रकारचा प्रयोग करण्यात आला. नेमका हा प्रयोग काय आहे, त्याबाबत...

कोरोनामुळे सर्वच गोष्टींचा पॅटर्न बदलला, त्याला रिॲलिटी शोज् देखील अपवाद नव्हते. प्रेक्षकांविना आणि केवळ परीक्षकांच्या उपस्थितीच शोज् घेण्यात आले. प्रेक्षकांविना होणाऱ्या कार्यक्रमांना म्हणावी तशी रंगतही येत नाही. असो. या परिस्थितीचा विचार करून फॉक्स टीव्हीने एक आगळा वेगळा प्रयोग केला आहे. ‘अल्टर इगो’ असं त्या शोचं नाव.

‘अल्टर इगो’ या शोमध्ये नेहमीप्रमाणे परिक्षक असतीलच, सोबतच स्पर्धकांच्या गाण्यांवर मनमुराद थिरकायला प्रेक्षकही असतील; मात्र स्पर्धक हे सादरीकरण आभासी पद्धतीने करतात. नुकतेच २२ सप्टेंबर रोजी ‘अल्टर इगो’ या शोच्या ऑडिशनचा पहिला भाग प्रदर्शित झाला. वरकरणी दिसायला हा कार्यक्रम पठडीतल्या गाण्याच्या रिॲलिटी शोप्रमाणेच भासेल. चमचमता रंगमंच, त्यापुढे विराजमान असलेले परिक्षक आणि आजूबाजूला प्रेक्षकांचा ओसंडून वाहणारा उत्साह. थोड्याच वेळात एक देखणी निवेदिका मंचावर येत सर्वांचं स्वागत करते आणि कल्पनेपलिकडील ‘अल्टर इगो’ या शोला सुरूवात होते.

सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचवत पहिल्या स्पर्धक मंचावर अवतरतो, मात्र प्रत्यक्षात नव्हे, त्याच्या आभासी अवतारात. या कार्यक्रमात स्पर्धक प्रत्यक्षात पडद्यामागेच असतात. विशिष्ट स्वरूपाचे जॅकेट परिधान केलेल्याची स्पर्धकाचा अत्यंत सुंदर आणि दिमाखदार अवतार ऑग्मेन्टेड रिॲलिटीच्या स्वरूपात मंचावर सादरीकरण करतो. प्रत्यक्षात एखादा गायक सादरीकरण करतो अगदी त्याचप्रमाणे हा अवतार देखील जशास तसे परफॉर्म करतो. गाणे संपल्यावर परीक्षकांकडून स्पर्धकांचे मूल्यांकनही केले जाते. त्यातून विजेत्यांना एक लाख डॉलरचे बक्षीस दिले जाणार आहे.

1) नेमके तंत्रज्ञान काय?

‘अल्टर इगो’मध्ये वापरण्यात आलेले महत्त्वाचे तंत्रज्ञान म्हणजे ऑग्मेन्टेड रिॲलिटी. त्या माध्यमातून संबंधित स्पर्धकाचा अवतार मंचावर सादरीकरण करतो. विशेष म्हणजे, यामध्ये स्पर्धक एका विशिष्ट प्रकारचा सूट परिधान करतात. त्यावर असंख्य सेन्सर्स लावण्यात आले आहेत. स्पर्धक रंगमंचामागील एका बंद खोलीतून गाणे गातो. त्यावेळी ॲडव्हान्स्ड कॅमेरा ट्रॅकिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने तब्बल १४ कॅमऱ्यांद्वारे स्पर्धकांच्या हालचाली टिपल्या जातात. स्मार्ट कॅमेरा आणि व्हिडिओ गेम डिझाईन सॉफ्टवेअरच्या मदतीने त्रिमितीय (थ्री डी) स्वरूपातील अवतार तयार करण्यात आला. लाईट्स आणि कॅमेऱ्यातून मिळालेल्या डेटाला मोशन कॅप्चर डेटाशी संलग्न करत अवताराचे डोळे, रंगसंगती, उंची, हालचाल आदी साकारली जाते.

2) अगदी हुबेहूब हालचाल

उत्तम ग्राफिक्स आणि ऑग्मेन्टेड रिॲलिटीच्या मदतीने ‘अल्टर इगो’तील अवतार हा प्रत्यक्षात स्पर्धकाने केलेल्या हालचाली, हरकतींप्रमाणे हालचाल करतो. स्पर्धकाच्या चेहऱ्यापुढे लावलेल्या एका खास कॅमेऱ्याच्या मदतीने चेहऱ्यावरील हावभावही अचूक टिपण्यात आले. अगदी चेहऱ्यावरील हास्य, डोळ्यातील अश्रूही अवतारामध्येही अगदी हुबेहुब दिसते.

3) अल्टर इगो म्हणजे काय?

अल्टर इगो हे विअरेबल सिस्टिम असून, ऑग्मेन्टेड रिॲलिटी, मशिन लर्निंग आणि ॲडव्हान्स कॅमेरा ट्रॅकिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे आभासी स्वरूप, म्हणजे अवतार तयार केला जातो. त्यात वापरण्यात आलेला खास सूट सदर व्यक्तीच्या हालचाली टिपण्यासाठी इलेक्ट्रिक इम्पल्स स्कॅन करतो. तसेच, कॅमेरा ट्रॅकिंगच्या मदतीने व्यक्तीचा आवाज, हालचाल आणि डोळ्यातील हावभाव टिपल्या जाते आणि अवताराकडून ते अचूकपणे सादर केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com