esakal | टेक्नोहंट : ‘विंडोज ११’मध्ये सुविधांची नवी द्वारे!
sakal

बोलून बातमी शोधा

Windows 11

टेक्नोहंट : ‘विंडोज ११’मध्ये सुविधांची नवी द्वारे!

sakal_logo
By
ऋषिराज तायडे

'विंडोज 11'ची वैशिष्ट्ये

‘मायक्रोसॉफ्ट’ने अनेक नव्या बदलांसह ‘विंडोज ११’ ही फ्रेश ऑपरेटिंग सिस्टीम नुकतीच लाँच केली आहे. जगातील सर्वाधिक वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून ती ओळखले जाते. विंडोज ११ सध्या वापरातील विंडोज 10 पेक्षाही अधिक यूजर फ्रेंडली आहे. फ्रेश लुक, नवी थीम युजर्सना लवकरच मिळणार आहेत.

फ्रेश लुक

विंडोज १०च्या तुलनेत ‘विंडोज ११’ला पूर्णपणे नवा आणि फ्रेश लुक देण्यात आला आहे. यामध्ये ॲडव्हान्स आणि आकर्षक थिम्सचा वापर करण्यात आला आहे. युजर्सना उच्चदर्जाचे ग्राफिक्स मिळणार आहेत.

स्टार्ट मेन्यू

आतापर्यंत डाव्या बाजूला असलेला स्टार्ट मेन्यू ‘विंडोज ११’मध्ये मध्यभागी असेल. त्यासोबत टास्कबारच्या नव्या रचनेमुळे विविध प्रकारच्या ड्राईव्ह, फाईल्स सहजपणे उघडता येणार आहेत.

व्हिडिओ कॉल

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ऑनलाइन एज्युकेशनचे वाढते प्रमाण लक्षात घेता ‘विंडोज ११’मध्ये ‘मायक्रोसॉफ्ट टीम’ जोडण्यात आले आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉलिंगचा सोप्पा पर्याय उपलब्ध झाला आहे.

फाईल साईज

मायक्रोसॉफ्टने विंडोजच्या नव्या अपडेट्सच्या फाईलची साईझ कमी केल्याने ती कमी वेळेत डाउनलोड आणि इन्स्टॉल करता येणार आहे.

मल्टिविंडो

ज्याप्रकारे आपण मोबाईलमध्ये एकावेळी अनेक विंडो वापरतो, तसेच ‘विंडोज ११’मध्ये एकापेक्षा जास्त विंडो वापरता येणार आहेत. त्यामुळे संगणकावर मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या विद्यार्थी, व्यावसायिकांना त्याचा फायदा होईल.

इझी टू हँडल

तुमचा लॅपटॉप टचस्क्रीन असल्यास तुम्हाला ‘विंडोज ११’मध्ये की-बोर्डशिवाय सहजपणे काम करता ये ईल. त्यासाठी खास फीचर्स देण्यात आले आहेत.

विंडोज स्टोअर

प्ले-स्टोअर, ॲप स्टोअरप्रमाणे ‘विंडोज ११’मध्ये विंडोज स्टोअर हे नवे फीचर देण्यात आले आहे. तिथून हवे ते अॅप सहजपणे डाऊनलोड करता येणार आहे. तसेच ॲमेझॉन ॲप स्टोअरच्या मदतीने तुमच्या आवडीचे अँड्रॉइड ॲप्ससुद्धा तुमच्या संगणकामध्ये डाउनलोड करता येणार आहे.

गेमिंग आणि ग्राफिक्स

आता विंडोज स्वतःहून ऑटो एचडीआरद्वारे गेम्समधील रंगसंगती अॅडजस्ट करेल. एक्सबॉक्समधील डायरेक्ट स्टोअरेज एपीआय आता संगणकावर उपलब्ध केले आहे. यामुळे वेगवान गेमिंगचा अनुभव घेता येणार आहे.

विंडोज 11 इन्स्टॉल करण्यासाठी काय हवे?

1. प्रोसेसर : एक गिगाहर्ट्झ क्षमतेचे, 64 बिट प्रोसेसरला सानुकूल दोन किंवा अधिक कोअर असलेले प्रोसेसर

2. रॅम : किमान 4 जीबी

3. स्टोरेज : 64 जीबीहून अधिक

4. सिस्टीम फर्मवेअर : यूईएफआय, सिक्युअर बूट

5. ग्राफिक्स कार्ड : DirectX 12 किंवा WDDM 2.0 ड्रायव्हरशी सानुकूल

6. डिस्प्ले : किमान 720p अधिक पिक्सल क्षमता असलेला

loading image