टेक्नोहंट : गॅजेट नवे, बजेट जुने!

हल्ली नवनव्या गजेट्सबाबत नागरिकांमध्ये बरीच उत्सुकता असते. अगदी स्वस्तातील हेडफोन्सपासून ते महागड्या मोबाईलसारखी नवी गॅजेट खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते.
mobile new gadgets
mobile new gadgetssakal
Summary

हल्ली नवनव्या गजेट्सबाबत नागरिकांमध्ये बरीच उत्सुकता असते. अगदी स्वस्तातील हेडफोन्सपासून ते महागड्या मोबाईलसारखी नवी गॅजेट खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते.

हल्ली नवनव्या गजेट्सबाबत नागरिकांमध्ये बरीच उत्सुकता असते. अगदी स्वस्तातील हेडफोन्सपासून ते महागड्या मोबाईलसारखी नवी गॅजेट खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते. हीच गॅजेट्स किफायतशीर दरात मिळाल्यास ‘सोने पे सुहागा’... अशाच काही बजेटमधील गॅजेट्सबद्दल खास गुढीपाडव्याच्या निमित्ताने...

लावा प्रोबड्स एन 3

वायर्ड ब्ल्यूटूथ श्रेणीतील नेकबँड इअरफोनमध्ये किफायतशीर दरामध्ये लावाने प्रोबड्स एन३ ही श्रेणी सादर केली. अवघ्या २० मिनिटांच्या चार्जिंगवर सुमारे १६० ते १७० मिनिटे प्लेबॅक टाइम ही या इअरफोनचे वैशिष्ट्यं. ११० एमएएचची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यास सात ते आठ तास हा इअरफोन सहजपणे वापरता येतो. ड्युअल डीव्हाईस कनेक्टिव्हिटी, वेगवान चार्जिंग, आयपी ६ प्रमाणित वॉटर प्रुफ क्वालिटी आणि व्हाइस असिस्टन्स आदी फीचर्स यात आहेत.

वैशिष्ट्ये

  • कनेक्टिव्हिटी : ब्ल्यूटूथ 5.0

  • बॅटरी : 110 mAh

  • वापर क्षमता : 9 तास

  • वजन : 25 ग्रॅम

  • उपलब्ध रंग : मिडनाईट ब्लॅक आणि रॉयल ब्ल्यू

  • वैशिष्ट्ये : आयपी 4 वॉटर प्रूफ, डायनामिक ड्रायव्हर्ससह उत्तम साऊंड क्वालिटी, कॉल/साऊंड कन्ट्रोलर, यूएसबी चार्जिंग

  • किंमत : 999 रुपये

आयटेल व्हिजन 3

किफायतशीर दरात सर्वसामान्यांचे अॅण्ड्रॉईड मोबाईल खरेदीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या आयटेलने नुकताच व्हीजन3 हा बजेट मोबाईल लॉन्च केला. 5000 mAh ची बॅटरी, 18W चे चार्जर, फिंगरप्रिंट सेन्सर, एचडी + आयपीएस डिस्प्ले या मोबाईलमध्ये देण्यात आला. ज्वेल ब्ल्यू, मल्टिकलर ग्रीन आणि डीप ओशन ब्लॅक या तीन रंगांत फोन आहे.

वैशिष्ट्ये

  • डिस्प्ले : 6.6'' HD+ IPS डिस्प्ले

  • प्रोसेसर : 1.6 GHz Octa-core Processor

  • रॅम : 3 GB

  • स्टोरेज : 64 GB

  • रिअर कॅमेरा : 8 MP + VGA Camera

  • फ्रंट कॅमेरा : 5 MP

  • बॅटरी : 5000 mAh (18 W)

  • ऑपरेटिंग सिस्टिम : अॅण्ड्रॉईड11

  • रंग : ज्वेल ब्ल्यू, मल्टिकलर ग्रीन आणि डीप ओशन ब्लॅक

  • किंमत : 7,999 रुपये

ट्रुक हॉरिझॉन डब्ल्यू 20

वायरेलस हेडफोन्स, इयरफोन्स आणि साऊंड क्षेत्रातील ऑडिओ ब्रॅण्ड ट्रुकने होरिझोन डब्ल्यू २० ही नवीकोरी स्मार्टवॉच लाँच केली. या स्मार्टवॉचमध्ये बिल्ट-इन जीपीएससह डीप वॉटर रेसिस्टण्ससह आयपी ६८ रेटिंग, मल्टिपल-स्पोर्टस् मोड आणि सुमारे १६८ तासांपर्यंत टिकणारी ३०० mAh बॅटरी देण्यात आली आहे. १.६९'''' फुल स्क्रीन टच एचडी कलर डिस्प्लेसह २४x७ हार्ट-रेट सेन्सर, ब्लड प्रेशर मॉनिटर, ट्रू ब्लड ऑक्सिजन लेव्‍हल पेडोमीटर, स्लीप मॉनिटर. स्मार्ट नोटिफिकेशन्स, डीएनडी मोड, सेडेण्टरी रिमांइडर, वेदर अपडेट, म्युझिक कंट्रोल, तसेच १००हून अधिक वॉचवॉलपेपर्सचा समावेश आहे.

वैशिष्ट्ये

  • डिस्प्ले : 1.69'' फुल स्क्रीन टच एचडी डिस्प्ले

  • बॅटरी : 300 mAh

  • वैशिष्ट्ये : बिल्ट-इन जीपीएससह ग्लोनास, डीप वॉटर रेसिस्टण्स, मल्टीपल-स्पोर्टस् मोड, हार्ट-रेट सेन्सर, ब्लड प्रेशर मॉनिटर, एसपीओ 2 मॉनिटर, पेडोमीटर, स्लीप मॉनिटर, स्मार्ट नोटिफिकेशन्स, डीएनडी मोड, वेदर अपडेट, म्युझिक कंट्रोल आदी

  • उपलब्ध रंग : ब्लॅक, रेड आणि आर्मी ग्रीन

  • वजन : 46 ग्रॅम

  • किंमत : 1,999 रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com