टेक्नोहंट : नवा महिना, नवे स्मार्टफोन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Smartphone

बाजारात येणाऱ्या नवनव्या स्मार्टफोनबाबत आपल्या सर्वांनाच उत्सुकता असते. कोणत्या कंपनीने कोणता नवा स्मार्टफोन लॉन्च केला, याबाबत आपण जाणून घेत असतो.

टेक्नोहंट : नवा महिना, नवे स्मार्टफोन

बाजारात येणाऱ्या नवनव्या स्मार्टफोनबाबत आपल्या सर्वांनाच उत्सुकता असते. कोणत्या कंपनीने कोणता नवा स्मार्टफोन लॉन्च केला, याबाबत आपण जाणून घेत असतो. नुकतेच रिअलमी, आयक्यू आणि नोकियाने नवे स्मार्टफोन सादर केले. त्याबाबत...

रिअलमी जीटी नियो 3

दर महिन्याला दर्जेदार स्मार्टफोन लॉन्च करत बाजारात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या रिअलमीने नुकताच रिअलमी जीटी नियो ३ हा स्मार्टफोन लॉन्च केला. महिन्याभरापूर्वी रिअलमी 9 आणि रिअलमी 9 स्पीड एडिशन हे मिड-प्रीमियम रेंजमधील दोन स्मार्टफोन सादर केले होते. त्यापाठोपाठ आता रिअलमी जीटी नियो 3 हा 80 वॉट्स आणि 150 वॉट्स अशा दोन चार्जिंग पर्यायांसह सादर झाला.

वैशिष्ट्ये

डिस्प्ले : 6.7” 120Hz FHD AMOLED डिस्प्ले

प्रोसेसर : Mediatek Dimensity 8100 5G Processor

रॅम - 8 GB, 12 GB

स्टोरेज : 128 GB, 256 GB

रिअर कॅमेरा : 50 MP + 8 MP + 2 MP

फ्रंट कॅमेरा : 16 MP

बॅटरी ः 4500 mAh (80W & 150W)

ऑपरेटिंग सिस्टिम : अॅण्ड्रॉईड 12

रंग : नायट्रो ब्लू, स्प्रिंट व्हाइट आणि अॅस्फाल्ट ब्लॅक

किंमत -

8GB+128GB (80W) - 36,999

8GB+256GB (80W) - 38,999

12GB+256GB (150W) - 42,999

आयक्यू झेड 6 प्रो

विवोची उपब्रॅण्ड असलेल्या आयक्यूने गेल्या काही दिवसांत उत्तमोत्तम स्मार्टफोन भारतात लॉन्च केले. गेल्या वर्षी आलेल्या आयक्यू झेड 5 नंतर बऱ्याच कालावधीने आता फाइव्ह-जी श्रेणीमध्ये झेड श्रेणीचा विस्तार करत झेड 6 श्रेणी सादर केली. त्यामध्ये आयक्यू झेड 6 आणि आयक्यू झेड 6 प्रो या दोन नव्या स्मार्टफोनचा समावेश आहे.

वैशिष्ट्ये

डिस्प्ले : 6.4” FHD+ AMOLED डिस्प्ले

प्रोसेसर : Qualcomm Snapdragon® 778 5G Processor

रॅम ः 6GB, 8 GB, 12 GB

स्टोरेज : 128 GB, 256 GB

रिअर कॅमेरा : 64 MP + 8 MP + 2 MP

फ्रंट कॅमेरा : 16 MP

बॅटरी - 4700 mAh (66W)

ऑपरेटिंग सिस्टिम - अॅण्ड्रॉईड 12

रंग : फॅण्टम डस्क आणि लीजन स्काय

किंमत -

6GB+128GB : 23,999

8GB+128GB - 24,999

12GB+256GB - 28,999

नोकिया जी21

एकीकडे बाजारात प्रीमियम, मिड-प्रीमियम रेंजमध्ये एकापाठोपाठ एक स्मार्टफोनमधील स्मार्टफोन लॉन्च होत असताना, दुसरीकडे बजेट सीरिजमध्येही अनेक स्मार्टफोन सादर होत आहेत. किफायतशीर दरात चांगले फीचर देणाऱ्या नोकियाने नुकताच जी21 हा नवाकोरा स्मार्टफोन भारत लॉन्च केला.

वैशिष्ट्ये

डिस्प्ले : 6.5” 90Hz डिस्प्ले

प्रोसेसर : Unisoc T606 Processor

रॅम ः 4GB, 6 GB

स्टोरेज : 64 GB, 128 GB

रिअर कॅमेरा : 50 MP + 2 MP + 2 MP

फ्रंट कॅमेरा : 8 MP

बॅटरी ः 5050 mAh (18W)

ऑपरेटिंग सिस्टिम : अॅण्ड्रॉईड 11

रंग : नॉर्डिक ब्ल्यू आणि डस्क

किंमत -

4GB+64GB - 12,999

6GB+128GB - 14,999

Web Title: Rushiraj Tayade Writes New Smartphone

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :mobilephone
go to top