टेक्नोहंट : ‘Next@Acer’चा ग्लोबल मेगाइव्हेंट

लॅपटॉप-कॉम्प्युटर क्षेत्रातील आघाडीची कंपनी एसरचा नुकताच next@acer हा ग्लोबल मेगाइव्हेंट पार पडला.
Acer laptop
Acer laptopSakal
Summary

लॅपटॉप-कॉम्प्युटर क्षेत्रातील आघाडीची कंपनी एसरचा नुकताच next@acer हा ग्लोबल मेगाइव्हेंट पार पडला.

लॅपटॉप-कॉम्प्युटर क्षेत्रातील आघाडीची कंपनी एसरचा नुकताच next@acer हा ग्लोबल मेगाइव्हेंट पार पडला. जगभरातील अनेक देशांमध्ये एकावेळी पार पडलेल्या या मेगाइव्हेंटमध्ये अनेक नवनवीन गॅजेट्स एसरकडून लॉन्च करण्यात आली. येत्या जुलैमध्ये ही नवी गॅजेटस् अमेरिकेतील बाजारपेठेत उपलब्ध होतील, त्यानंतर काही दिवसांतच ती भारतीय बाजारपेठेतही दाखल होतील. त्यातील काही निवडक गॅजेट्सबाबत...

Acer Swift 3 OLED

हा लॅपटॉप 14 इंची OLED डिस्प्ले, जवळपास 92 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशोसह लॉन्च झाला. उत्तम परफॉर्मन्ससाठी हा लॅपटॉप 12th Gen Intel Core H-series प्रोसेसर आणि Intel Iris® Xe ग्राफिक्सने सुसज्ज आहे. अवघ्या 17.9 मिलिमीटरच्या अल्युमिनिअस चेसिसमुळे लॅपटॉपचे वजन हे केवळ 1.4 किलो आहे. त्यामुळे हा लॅपटॉप वापरायला अगदी सहजसोपा आहे. 10 तासांची बॅटरी क्षमता दिली असून, 30 मिनिटांच्या चार्जमध्ये हा लॅपटॉप किमान चार तास चालू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. 16 जीबी रॅमसह या लॅपटॉपमध्ये Wi-Fi 6E, Thunderbolt™ 4, HDMI 2.1, USB4 आदी फीचर्स देण्यात आले आहे.

Acer TravelMate Laptops

एसरने या सीरिजमध्ये TravelMate P4 आणि TravelMate Spin P4 हे बिझनेस श्रेणीतील दोन लॅपटॉप लॉन्च केले. हे दोन्ही लॅपटॉप अत्याधुनिक 12th Gen Intel® Core™ किंवा AMD Ryzen™ PRO प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. TravelMate P4 हा लॅपटॉप 14 आणि 16 इंची व्हेरियंटमध्ये लॉन्च झाला असून यामध्ये 16:10 अस्पेक्ट रेशोसह IPS डिस्प्ले दिला आहे. दुसरीकडे TravelMate Spin P4 मध्ये Corning Gorilla Glass अॅन्टी ग्लेअर टचस्क्रीन आहे. त्याशिवाय TravelMate P2 हा नोटबुकसुद्धा एसरने लॉन्च केला असून हा मॉडेल 12th Gen Intel Core vPro प्रोससरसह 14 आणि 15.6 इंची डिस्प्ले व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला.

Predator Helios 300 SpatialLabs

खास गेमिंगसाठी एसरने प्रीडेटर श्रेणीमध्ये Predator Helios 300 SpatialLabs ही नवीकोरी लॅपटॉप सीरिज लॉन्च केली. या लॅपटॉपमधील खास SpatialLabs TrueGame अप्लिकेशनमुळे तुम्हाला कोणत्याही चष्म्याविना स्टिरिओस्कोपिक 3D गेमिंगचा अनुभव घेता येतो. सध्या हा लॅपटॉप जगभरातील 50 हून अधिक लोकप्रिय गेम्स सपोर्ट करतो. पुढे नव्या अपडेट्समध्ये हा आकडा आणखी वाढत जाणार आहे. गेमिंगचा अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी यामध्ये 12th Gen Intel® Core™ i9 प्रोसेसर आणि NVIDIA® GeForce RTX™ 3080 ग्राफिक्स देण्यात आले आहे. त्याशिवाय प्रीडेटर श्रेणीत Predator Triton 300 SE हा लॅपटॉप, Predator XB273K LV and Acer Nitro XV272U RV हे दोन गेमिंग मॉनिटरही सादर केले.

Aspire Vero Laptops

एसरने अस्पायर व्हेरो सीरिजमध्ये 14 इंची आणि 15 इंची फुल एचडी डिस्ल्पे असलेले दोन लॅपटॉप लॉन्च केले. दोन्ही लॅपटॉपमध्ये 12th Gen Intel® Core™ प्रोसेसर देण्यात आला आहे. उत्तम कनेक्टिव्हिटी आणि वेगवान परफॉर्मन्ससाठी या लॅपटॉपमध्ये Intel® Iris® Xe ग्राफिक्स आणि वाय-फाय 6 कनेक्टिव्हिटी आहे. त्याशिवाय यामध्ये Type-C चे चार आणि USB 3.2 Gen1 Type-A चे दोन पोर्टस दिले आहे. त्यामुळे लॅपटॉप बंद असतानाही त्यावरून मोबाईल सहजपणे चार्ज करता येतो. या लॅपटॉपमध्ये दिलेला फुल एचडी कॅमेरा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ऑनलाइन एज्युकेशनसाठी फायदेशीर ठरतो. याशिवाय व्हेरो सीरिजमध्ये एसरने व्हेरो मॉनिटर्स, व्हेरो प्रोजेक्टर, तसेच व्हेरो किबोर्ड आणि माऊसही लॉन्च केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com