टेक्नोहंट : व्हॉट्सॲपचं नवं फीचर, नवं अपडेट | Whatsapp | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

whatsapp
टेक्नोहंट : व्हॉट्सॲपचं नवं फीचर, नवं अपडेट

टेक्नोहंट : व्हॉट्सॲपचं नवं फीचर, नवं अपडेट

जगात सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सॲप. अगदी सुरुवातीला केवळ चॅटिंग स्वरूपातील संवादापुरतं व्हॉट्सॲप मर्यादित होतं. त्यानंतर हळू हळू नव्या गरजांची आणि अपडेट्सची कास धरत व्हॉट्सॲपमध्ये अनेक नवे फीचर्स उपलब्ध झाले. ठरावीक कालावधीनंतर नवनवे अपडेट्स व्हॉट्सॲप आणत असते. नुकतेच सादर केलेल्या व्हॉट्सॲपच्या नव्या अपडेट्सबाबत...

1) डेक्सटॉप फोटो एडिटर

व्हॉट्सॲपवरून आपण नेहमीच फोटो, व्हिडिओ पाठवत असतो. अनेकदा फोटो सेंड करण्यापूर्वी आपण तो एडिटही करतो. आजकाल डेक्सटॉपवर व्हॉट्सॲप कनेक्ट करून वापरणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळं व्हॉट्सॲपनं आपल्या नव्या अपडेटमध्ये फोटो एडिटिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. या फीचरच्या मदतीने तुम्हाला व्हॉट्सॲप वेबवरून फोटो पाठवताना फोटो एडिट करता येणार आहे.

2) स्टीकर सजेशन

व्हॉट्सॲपमध्ये आतापर्यंत स्टिकर्स मर्यादित स्वरूपात होते, मात्र आता व्हॉट्सॲपच्या नव्या अपडेटमध्ये तुम्हाला चॅटिंगमधील मजकुराच्या आधारावर स्टिकर्स सुचवले जाणार आहे. या अपडेटला स्टिकर्स जजिंग फीचर’ असे नाव दे ण्यात आले आहे. डब्ल्यूएबीटा इन्फोने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही व्हॉट्सॲपवर चॅटिंगमध्ये HaHa टाइप करताच वेगवेगळ्या प्रकारचे हसणारे स्टीकर तुम्हाला सुचवले जातील. त्यापैकी तुमच्या आवडीनुसार स्टीकर निवडून पाठवता येणार आहे.

3) लिंक प्रीव्ह्यू

एखाद्या वेबसाइटची किंवा व्हिडिओची लिंक व्हॉट्सॲपवर पाठवताना त्याची प्रीव्ह्यू आपल्याला पॉपअप स्वरूपात दिसते. या फीचरमध्ये व्हॉट्सॲपने नव्याने बदल केला आहे. नव्या अपडेटनुसार, यूजरला आता संपूर्ण लिंक प्रीव्ह्यूमध्ये पाहता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेल्या लिंकमध्ये नेमका कुठला मजकूर आहे, हे जाणून घेणे आता सोपे होणार आहे.

4) विना इंटरनेट वेब कनेक्शन

लॅपटॉप किंवा डेक्सटॉपवर व्हॉट्सॲप कनेक्ट करायचे असल्यास तुम्हाला तुमच्या मोबाईलवर इंटरनेट सुरू असणे आवश्यक असते. काही कारणास्तव मोबाईलचं इंटरनेट कनेक्शन बंद झाल्यास किंवा नेटवर्क नसल्यास डेस्कटॉपवरील व्हॉट्सॲपही बंद पडते. व्हॉट्सॲपच्या नव्या अपडेटमध्ये एकदा तुम्ही व्हॉट्सॲप वेब सुरू केल्यानंतर मोबाईलवरील इंटरनेट बंद झाले तरीही डेस्कटॉपवरील व्हॉट्सॲप सुरूच राहणार आहे. त्यासाठी डेस्कटॉपच इंटरनेट कनेक्शन सुरू असणं गरजेचं असणार आहे.

loading image
go to top