
मॉस्को : पृथ्वीचा सर्वांत जवळचा ग्रह असलेल्या मंगळावर मानवाला राहण्यास योग्य वातावरणाची चाचपणी सध्या अमेरिका, रशिया आदी देशांमधील अवकाश संशोधन संस्था करीत आहेत. यातच या लाल ग्रहावर जाण्यासाठी यान तयार करण्यात रशियाने मोठा टप्पा गाठला असून त्याद्वारे ३० दिवसांत मंगळवार पोहोचणे शक्य होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.