
Luna 25 Update : रशियाची लूना 25 मोहीम ही अगदी शेवटच्या टप्प्यात जाऊन संकटात सापडली आहे. 21 ऑगस्ट रोजी लूनाचं चंद्रावर लँडिंग करण्याची रशियाची योजना होती. मात्र, आता याला उशीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शनिवारी लूना 25 यानामध्ये काही तांत्रिक अडचण झाल्याचं समोर आलं. रशियन स्पेस एजन्सी रोस्कॉस्मॉसने याबाबतची माहिती दिली. चंद्रावर लँडिंगपूर्वी लूनाची चाचणी घेण्यात येत होती. यावेळी हा बिघाड दिसून आला.
चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी लूना 25 ला आधी चंद्राच्या जवळच्या कक्षेत पाठवणं गरजेचं आहे. यासाठीच शनिवारी जेव्हा लूनामध्ये थ्रस्ट जनरेट करण्यात आला, तेव्हा त्यातील ऑटोमॅटिक स्टेशनवर 'इमर्जन्सी' सिग्नल आला. तांत्रिक अडचण समोर आल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.
रशियाकडून याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. तसंच सोमवारी (21) ऑगस्ट रोजी होणारं लँडिंग पुढे ढकललं जाईल की नाही याबाबत देखील स्पेस एजन्सीने स्पष्टीकरण दिलेलं नाही. जर आज हा बिघाड दुरुस्त होऊन ऑर्बिट मॅन्युव्हर यशस्वी झालं, तर कदाचित लूना 25चं नियोजित वेळेप्रमाणे लँडिंग होऊ शकतं.
11 ऑगस्ट रोजी लूना 25चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. यानंतर अवघ्या पाच ते सहा दिवसांमध्ये ते चंद्राच्या कक्षेत पोहोचलं होतं. सध्या ते चांद्रयान-3 सोबत चंद्राच्या कक्षेत आहे. भारताच्या चांद्रयानाप्रमाणेच लूनादेखील चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.