
मुंबई : डिजिटल माध्यमांच्या स्पर्धेत सलग दुसऱ्या महिन्यातही सकाळ डॉट कॉम ने महाराष्ट्रात आपलं नंबर 1 स्थान कायम ठेवलं आहे. वाचकांचा विश्वास, अचूक बातम्या आणि वेगवान अपडेट्स यामुळे हा यशाचा मान मिळाल्याचं सकाळ डिजिटल टीमने सांगितलं.
अलीकडे प्रसिद्ध झालेल्या comscore च्या आकडेवारीनुसार, मे आणि जून या दोन्ही महिन्यांत ई-सकाळ डॉट कॉम महाराष्ट्रात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या न्यूज वेबसाइट ठरली आहे. या दोन महिन्यांत वेबसाईटवर कोट्यवधी वाचकांनी भेट दिली असून, त्यातील मोठा वाटा महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील वाचकांचा आहे.