esakal | सकाळची डिजिटल भरारी, क्विन्टटाईप टेक्नॉलॉजि इंडियासोबत केला महत्त्वाचा करार

बोलून बातमी शोधा

सकाळची डिजिटल भरारी, क्विन्टटाईप टेक्नॉलॉजि इंडियासोबत केला महत्त्वाचा करार}

सकाळच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची सुरवात ई-सकाळ डॉट कॉम या मुख्य वेबसाईटच्या माध्यमातून सुरु होणार आहे

सकाळची डिजिटल भरारी, क्विन्टटाईप टेक्नॉलॉजि इंडियासोबत केला महत्त्वाचा करार
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : डिजिटल टेक्नॉलॉजिमधील भारतातील अग्रगण्य कंपनी (Quintype Technologies India) क्विन्टटाईप टेक्नॉलॉजि इंडियामार्फत सकाळ माध्यम समूह येत्या काळात कात टाकताना पाहायला मिळणार आहे. सकाळ माध्यम समूह हा भारतातील नामांकित आणि विश्वसार्ह माध्यम समूह आहे. सकाळ माध्यम समूहाने त्यांच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी क्विन्टटाईप टेक्नॉलॉजि इंडिया या संस्थेची निवड केली आहे. त्यामुळे येत्या काळात ई सकाळच्या माध्यमातून सकाळ माध्यम समूहाचं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ठळकपणे पाहायला मिळणार आहे.  
 
ई सकाळच्या वाचकांना सर्वंवोत्तम अनुभव देण्यासाठी, क्विन्टटाईप टेक्नॉलॉजि इंडियाकडून मुखत्वे कंटेट मॅनेजमेंट, मॉनीटायझेश, ऑडियन्स एन्गेजमेंट, रिअल टाईम अ‌ॅनालिटिक्स, ओमनीचॅनल कंटेट डिस्ट्रीब्युशन, API अ‌ॅक्सेस, मल्टीसाईट या महत्त्वाच्या बाबींसाठी मदत घेतली जाणार आहे. 

सकाळच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची सुरवात ई-सकाळ डॉट कॉम या मुख्य वेबसाईटच्या माध्यमातून सुरु होणार आहे. 'क्विन्टटाईप बोल्ड' नामक उत्पादनाच्या माध्यमातून ई सकाळ या वेबसाईटवरील बातम्या आणि वैविध्यपूर्ण मजकूर अतिशय सोप्या पद्धतीने प्रकाशित तर करता येईलच सोबतच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील शेअर करता येणार आहे. 

"आमच्या डिजिटल माध्यमांवर येणाऱ्या वाचकांच्या गरजा आणि आणि मागण्या सातत्याने बदलताना पाहायला मिळतायत. अशात सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात डिजिटल माध्यमांवर वाचकांचा ओघ कमालीचा वाढलाय. क्विन्टटाईपच्या माध्यमातून होणाऱ्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे आम्हाला नवनवीन प्रयोग करून आमच्या वाचक आणि दर्शकांना उत्तमोत्तम अंडी सुरक्षित अनुभव देता येईल, जो की गेल्या ८५ वर्षांपासून आम्ही सातत्याने देत आलो आहोत', असं सकाळ माध्यम समूहाचे संचालक श्री अभिजित पवार म्हणालेत.

माध्यमं 'मोबाईल फर्स्ट'कडून 'केवळ मोबाईल' म्हणजेच 'मोबाईल ओन्ली' या कन्टेन्ट स्ट्रॅटेजीकडे वळतायत, या प्रवासात क्विन्टटाईपच्या माध्यमातून डिजिटल माहिती निर्मात्यांना म्हणजेच डिजिटल क्रिएटर्सना नवनवीन वाचकाशी सांगड घालून देणे आणि सोबतच मॉनिटायझेशन चे पर्याय उपलब्ध करून दिले जातात. 

"आम्ही सकाळच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनदरम्यान सकाळसोबत काम करण्यास कमालीचे उत्सुक आहोत. आम्हाला आमच्यासोबत काम करणाऱ्या प्रकाशकांना उत्तमोत्तम सुविधा देऊन त्यांना त्यांची ऊर्जा वाचकांना उत्तमोत्तम बातम्या किंवा माहिती देण्यासाठी वापरता यावी असं कायम वाटत असतं. विश्वासार्ह आणि दर्जेदार पत्रकारितेसाठी सकाळ माध्यम कायमच ओळखला जातो.  म्हणूनच आम्ही सकाळसोबत काम करण्यास आणि त्यांच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये हातभार लावण्यास उत्सुक आहोत", असं क्विन्टटाईप इंडियाचे CEO चिरदीप शेट्टी म्हणालेत. 

सकाळने डिजिटल प्रकाशनासाठी क्विंटाइपसोबत करार केला असून यामध्ये त्यांचे सीएमएस, सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट सिस्टम अॅक्सेसस्टाइप, ऑडियन्स एगेंजमेंट सोल्युशन, मोबाईल अ‌ॅप्स आणि त्यांची वेबसाईट डेव्हलपमेंट, या सर्व बाबींचा यामध्ये समावेश आहे.

Sakal taps Quintype as strategic provider for their big digital transformation