Sam Altman Net Worth : 'ओपन एआय' कंपनीत नाही एकही शेअर.. मग अब्जाधीश सॅम अल्टमनला कुठून मिळतो पैसा?

Sam Altman Investments : 'चॅटजीपीटी' बनवणाऱ्या 'ओपन एआय' कंपनीचे फाऊंडर सीईओ सॅम अल्टमन यांची नेट वर्थ आता तब्बल दोन अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे.
Sam Altman Net Worth
Sam Altman Net WortheSakal

Sam Altman Net worth crosses USD 2 Billion : 'चॅटजीपीटी' बनवणाऱ्या 'ओपन एआय' कंपनीचे फाऊंडर सीईओ सॅम अल्टमन यांची नेट वर्थ आता तब्बल दोन अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे. चॅटजीपीटी प्रसिद्ध झाल्यामुळे कंपनीने भरपूर पैसा कमावला आहे. मात्र, सॅम अल्टमन यांच्या संपत्तीमध्ये भर होण्याचं कारण ओपन एआय नाहीच, अशी माहिती ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टमध्ये समोर आली आहे.

खरंतर कंपनीचे संस्थापक-सीईओ (Open AI Founder CEO) असले, तरी सॅम यांच्याकडे ओपनएआय कंपनीमध्ये एकही शेअर नाही. त्यामुळे कंपनीचे शेअर्स कितीही वर गेले तरी सॅम अल्टमन यांच्या संपत्तीत कोणतीही वाढ होणार नाही. पण मग सॅम अल्टमन यांची संपत्ती नेमकी कशामुळे वाढत आहे, आणि त्यांच्या कमाईचा सोर्स काय आहे? (Sam Altman Open AI Shares)

ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सॅम यांनी कित्येक व्हीसी फंड्स आणि स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. या सर्व कंपन्याच्या माध्यमातून सॅम यांना कोट्यवधी रुपये मिळतात. सॅम यांनी अपोलो प्रोजेक्टमध्ये 434 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. सोबतच हीलियन एनर्जी इनकॉर्पोरेटेड या कंपनीतही सॅम यांचे शेअर्स आहेत. (Sam Altman Shares)

Sam Altman Net Worth
Elon Musk Sues Sam Altman : चॅटजीपीटी बनवणाऱ्या 'Open AI' कंपनीला इलॉन मस्कने खेचलं कोर्टात; सॅम अल्टमनसोबत कशामुळे वाजलं?

'रेडिट' ठरणार खजिना

सॅम अल्टमन हे 'रेडिट' कंपनीत एक मोठे शेअरहोल्डर आहेत. काही दिवसांमध्येच या कंपनीचा आयपीओ येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार Reddit तब्बल 6.5 बिलियन डॉलर्स एवढं इव्हॅल्युएशन करण्याची शक्यता आहे. यानंतर सॅम यांच्या शेअर्सची किंमत 400 मिलियन डॉलर्सपेक्षा अधिक होऊ शकतं. त्यामुळे पुढील तीन महिन्यांमध्ये सॅम यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. (Reddit IPO)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com