OpenAI CEO: सॅम ऑल्टमन OpenAIमध्ये परत येणार नाहीत, भारतीय वंशाच्या सीईओच्या जागी यांना दिली तात्पुरती जबाबदारी

OpenAI CEO: सॅम ऑल्टमन OpenAIमध्ये परत येणार नाहीत, भारतीय वंशाच्या सीईओच्या जागी यांना दिली तात्पुरती जबाबदारी

OpenAI च्या बोर्ड कडून Emmett Shear कडे CEO पदाची जबाबदारी

Sam Altman यांना OpenAI च्या सीईओ पदापासून दूर केल्यानंतर आता सीईओ पदाची जबाबदारी पुन्हा त्यांच्याकडे देण्याच्या गुंतवणूकदारांच्या मागणीला बोर्डाने नाकारले आहे.

ऑल्टमन यांना काढून टाकल्यानंतर ओपनएआयने मीरा मूर्तीची अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती केली होती. आता माहिती मिळत आहे की व्हिडिओ स्ट्रीमिंग साइट ट्विचचे सह-संस्थापक एम्मेट शिअर यांना कंपनीचे अंतरिम सीईओ बनवण्यात आले आहे. Shear कडे यापूर्वी अमेझॉनची गेम स्ट्रिमिंग साईट Twitch च्या सीईओ पदाची जबाबदारी होती. त्यांनी या वर्षाच्या सुरूवातीलाच हे पद सोडलं होतं. 

द इन्फॉर्मेशननुसार, ओपनएआयचे सह-संस्थापक आणि बोर्ड सदस्य इलया सुत्स्केव्हर यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की ऑल्टमन कंपनीत परतण्यास तयार नाहीत. त्यांच्याशी अनेक दिवसांपासून सुरू असलेली चर्चा अयशस्वी ठरली आहे.

ऑल्टमॅन यांची हकालपट्टी करण्याच्या बोर्डाच्या निर्णयामुळे कंपनीचे गुंतवणूकदार आणि वरिष्ठ अधिकारी नाराज होते. कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑल्टमन यांना पाठिंबा दिला. यामध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ब्रॅड लाइटकॅप आणि अंतरिम सीईओ नियुक्त झालेल्या मीरा मूर्ती या नावांचा समावेश होता. कंपनीचा मुख्य गुंतवणूकदार मायक्रोसॉफ्टही ऑल्टमन यांना परत आणण्याचा प्रयत्न करत होते.

OpenAI चे संकट वाढू शकते

ऑल्टमन यांच्या न परतल्याने ओपनएआयचे संकट वाढू शकते. खरं तर, ऑल्टमन यांना काढून टाकल्यानंतर, कंपनीच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इशारा दिला होता की जर त्यांना परत आणले नाही तर ते देखील कंपनी सोडू शकतात.

ऑल्टमन यांना काढून टाकल्यानंतर, बोर्डाचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी राजीनामा दिला आणि दोन सीनियर रिसर्चर्सनी चेतावणी दिली की ते देखील कंपनी सोडून ऑल्टमन यांच्यासोबत सामील होऊ शकतात.

ऑल्टमन नवीन कंपनी सुरू करू शकतात

काही अहवाल सांगतात की ऑल्टमन आणि राजीनामा दिलेले ब्रॉकमन नवीन कंपनी सुरू करण्याबाबत त्यांचे मित्र आणि गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहेत.

असेही बोलले जात आहे की जर ऑल्टमन यांनी नवीन कंपनी सुरू केली तर ओपनएआयमध्ये काम करणारी इतर अनेक मोठी नावे त्यांच्यासोबत सामील होऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com