सॅमसंग गॅलेक्सी A51 आणि A71 म्हणजे भन्नाट फीचर्स, टॉप नॉच प्रायव्हसी आणि उत्तमोत्तम रंग

सॅमसंग गॅलेक्सी A51 आणि A71 म्हणजे भन्नाट फीचर्स, टॉप नॉच प्रायव्हसी आणि उत्तमोत्तम रंग

सध्याच्या मिलेनिअल्स जनरेशनला सेल्फी घेण्याची भारी हौस आहे. मग ते आपल्या मित्रांना दाखवायला असोत, सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी असोत किंवा असेल आपल्याकडे केवळ ठेऊन देण्यासाठी. कारण काहीही असो, मात्र जेंव्हा कुणीही तुमचा फोन त्यांचा हातात घेतो आणि त्यातले फोटो पाहतो, तेंव्हा थोडं का होईना अनकंफर्टेबल तर नक्कीच वाटतं, नाही का ? आपण स्क्रीन लॉक  ठेवतो, पासवर्ड वापरतो पण तरीही तुमच्याकडे कुणी मोबाईलचा पासवर्ड विचारला तर ? तुम्ही कशा प्रकारे नकार देतात ? 
किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असे काही स्क्रीन शॉट्स आहेत जे तुम्ही तुमच्या अगदी जवळच्या मित्रांसोबत शेअर केलेत, मात्र तुमच्या आईला कुणालातरी तुमच्या फोनवरून फोन करायचा. आता आई आपले पाठवलेले स्क्रीन शॉट्स पाहणार तर नाहीना म्हणून धाकधूक वाटतेय ?  

म्हणूनच तुम्हाला गरज आहे अल्ट Z लाईफची, जिथे तुम्ही मनात यत्किंचितही शंका न ठेवता तुम्ही तुमची प्रायव्हसी अबाधित ठेऊ शकतात. हे असं आयुष्य आहे जिथं तुमचं खासगी आयुष्य कायम खासगी राहील आणि तुमच्या शिवाय कुणीही तुमचा खासगी डेटा पाहू शकणार नाही. 

त्यामुळे  Alt Z Life सॅमसंग गॅलेक्सी A51 and A71 सोबत जगण्यास तयार राहा. कारण सॅमसंग कायमच आपल्या प्रीमियम डिझाईन आणि कटिंग ऐज सोबतच आता पुन्हा एकदा या अत्याधुनिक दोन स्मार्टफोनच्यामध्यातून आपला दर्जा वाढवताना दिसतोय. 

अल्ट Z लाईफ इज वे टू गो 

आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेंव्हा आपण आपला फोन दुसऱ्याच्या हातात देणं मुदामून टाळतो, नाही का ? काही केसेसमध्ये तुम्हाला बळजबरी तुमचा फोन तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांच्या हातात द्यावा लागतो. अशावेळेस तुम्हाला कायम तुमच्या खासगी फोटोंबाबत चिंता सतावते.  

अगदी म्हणूनच सॅमसंगने सर्वात आधी क्विक स्विच फिचर आणि कन्टेन्ट सजेशन असे दोन भन्नाट फीचर्स काढले आहेत. मेक इन इंडिया प्रकल्पाचा भाग असेलेले हे दोन्ही फीचर्स तुम्हाला तुमचा मोबाईल कुणाच्याही हातात देताना निश्चित ठेवतात.

क्विक स्विच फीचरमुळे तुम्हाला तुमचा मोबाईल वापरत असतातानाच, मोबाईलमधील फोटो गॅलरी, ब्राउझर किंवा मोबाईल अप्लिकेशन आणि WhatsApp वापरत असताना केवळ पावर बटन डबल क्लिक करून पब्लिक मोडमधून प्रायव्हेट मोडमध्ये स्विच करता येतं. समजा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये आहात आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमधील खासगी फोटो तुमच्या मित्राला दाखवत असताना तुमचा बॉस तिथे आला तर तुम्हाला ते फोटो बॉसने पाहू नये असं नक्कीच वाटत असेल. अशा वेळेस तुम्ही काय कराल ?

अशीच काहीशी वेळ अभिनेत्री राधिका मदानवर येते. तेंव्हा अंदाज लावा राधिकाने काय बरं केलं असेल ? तिने क्विक स्विच फिचर वापरलं आणि तिच्या बॉसला सत्य काय आहे हे कधीही समजलं नाही 

हा व्हिडीओ तुम्हाला हे फिचर सॅमसंग गॅलेक्सी A51 आणि A71 वर कसं वापरावं हे दाखवतो. 


तर दुसरीकडे इंटेलिजंट कन्टेन्ट सजेशन हे फिचर म्हणजे व डिव्हाईस आर्टिफिशयल इंटेलिजन्सवर आधारित आहे. या फीचरमुळे तुमच्या फोनमधील फोटो अगदी सेल्फी गॅलरीच्या प्रायव्हेट व्हर्जनमध्ये साठवून ठेवले जातात. त्यामुळे तुम्हाला जे फोटो इतरांना दाखवायचे नाहीतअशांचा केवळ चेहरा किंवा ते फोटो सिलेक्ट करून तुम्ही ते अत्यंत खासगी ठेऊ शकतात. 

हा व्हिडीओ पाहा आणि जाणून घ्या हे फिचर वापरायचं कसं 

अद्ययावत फ्लॅगशिप कॅमेरा फीचर्स : 
जेव्हा स्मार्टफोनमधून फोटो काढण्याची वेळ येते, तेंव्हा सॅमसंग कायम चांगले फोटो कसे येतील याची काळजी घेतं. दोन्ही फोनमध्ये क्वाड कॅमेरा बसवण्यात आलाय सोबतच कंपनीचे फ्लॅगशिप कॅमेरा फिचर देखील आहेत. 

यामधील सिंगल टेक फिचरमुळे तुम्हाला एकाच वेळी ७ फोटो आणि तीन व्हिडीओ काढता येतात. या स्मार्टफोन कॅमेऱ्याची याची रेंज अचाट करणारी आहे. यामधून तुम्ही इमेजेस, शॉर्ट मुव्हीज किंवा जिफ आणि बरंच काही कॅप्चर करू शकतात. आणि तेही तुम्हाला एकाच अल्बम मध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला केवळ एक क्लिक करायचंय. बाकी सर्व काम तुमचा मोबाईल स्वतःच करणार आहे. 

या कॅमेऱ्यामध्ये असणारं नाईट हायपरलॅप्स फिचर तुम्हाला रात्रीच्या मंद उजेडात देखील उत्तम हायपरलॅप्स व्हिडीओ काढण्यास मदत करतील. तुम्हाला हा फोन जेंव्हा तुमच्या हात असेल तेंव्हा कोणत्या गोष्टीचा आनंद अनुभवता येत नाहीये, असं अजिबात होणार नाही. 

जर तुम्हाला वाटत असेल एवढयात झालं तर जरा थांबा, या मोबाईलमध्ये क्विक व्हिडीओ हे फिचर देखील आहे. यामुळे तुमच्याकडे अगदी कमी वेळ असतानाही तुम्ही मोठे आणि लांब व्हिडीओ कॅप्चर करू शकतात. केवळ तुमच्या कॅमेऱ्यावरील कॅप्चर बटण काही वेळ दाबून ठेवा आणि तुमचे स्पेशल क्षण रेकॉर्ड होत राहतील.  

सेल्फी कॅमेऱ्यात, एकाच फ्रेममध्ये, एकापेक्षा अधिक जणांना कॅप्चर करायचंय? नो प्रॉब्लेम ! या कॅमेऱ्यातील स्मार्ट सेल्फी अँगल फिचर तुम्हाला अगदी इंटेलिन्जन्टली वाईड अँगलमध्ये  स्विच करतो, जेणेकरून तुम्हाला कायम सर्वोत्तम सेल्फी कायम मिळत राहतील.   

यासोबत कस्टम फिल्टर फिचर तुम्हाला तुमच्या फोटोंमध्ये बदल करण्यास मदत करतो. या फीचरमुळे तुम्ही काढलेल्या फोटोंमध्ये तुम्हाला विविध फिल्टर्स वापरता येतात. ज्यात तुम्ही फोटोचा बॅग्राऊंड ब्लर करून किंवा तुम्हाला हवे तसे रंग त्यामध्ये भरून ब्लर देखील करता येतात. 

गॅलेक्सी A51मध्ये असंही एक फिचर आहे ज्यामध्ये तुम्ही रेकॉर्डिंग करत असताना कॅमेरा स्विच करू शकतात. यामाध्यमातून तुम्ही फ्रंट आणि बॅक या दोनही कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्डिंग सुरु असताना वापर करू शकतात. आता सांगा आहे की नाही नाही सोयीचं ? 

शेवटी, याच्या कॅमेऱ्यामध्ये AI गॅलरी झूम देखील आहे. यामार्फत तुम्ही लो-रेस इमेजेसची क्वालिटी सुधारू शकतात.

 
आता कॅमेऱ्याबद्दल जाणून घेऊयात : 
गॅलेक्सी A51 मध्ये  48 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर कॅमेरा,12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड लेन्स कॅमेरा, 5 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स कॅमेरा असणार आहे. यामध्ये 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा फ्रंटला आहे.  

तर दुरीकडे, गॅलेक्सी A71 फोनमध्ये तुम्हाला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर कॅमेरा मिळतो, दुसरा कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड लेन्स सोबतच 123 डिग्री फिल्ड ऑफ व्ह्यू सोबत आहे. सोबतच 5 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमरा आहे. तुम्हाला एखाद्याचा क्लोजअप फोटो, पोट्रेट फोटो, तुमच्या समोर असलेल्या लँड्स्केपचा अल्ट्रा वाईड फोटो काढायचा असल्यास गेलेक्सी A71 चा कॅमेरा या फोटोंमध्ये पारंगत आहे. यामध्येही 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा फ्रंटला आहे.  

गॅलेक्सी A51मध्ये आहे सॅमसंग नॉक्स जे पुरवते अतिरिक्त प्रोटेक्शन 
प्रायव्हसी महत्त्वाची आहे म्हणूनच सेक्युरिटी तितकीच महत्त्वाची. याच पार्श्वभूमीवर सॅमसंगने त्यांचं 'मल्टी लेअर्ड डिफेन्स ग्रेड प्रोटेक्शन सेक्युरिरी प्लॅटफॉर्म फिचर नॉक्स दिलेलं आहे. हे स्मरफोनमध्ये हार्डवेअर चिप स्वरूपात आणि मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर स्वरूपात देखील आहे. नॉक्स तुमच्या फोनमधील व्हिडीओ, फोटो, पासवर्ड, सॅमसंग पे चे ट्रान्झॅक्शन, तुमच्या महत्त्वाच्या फाईल एन्क्रिप्ट आणि आयसोलेट करतं.  
आणखीन काय ?

हे दोन्ही फोन भन्नाट आहेत. गॅलक्सी A71 हा 7.7 मिलियटर जाढिचा पंच होल कॅमेऱ्यासह असणारा त्या फोनच्या कॅटेगरीमधील सर्वात स्लिम फोन मानला जातो.  

सरतेशेववटी दोन्ही फोन हे सुंदर चार रांगांमध्ये उपलब्ध आहेत. प्रिझम क्रश व्हाईट, प्रिझम क्रॅश ब्लॅक, प्रिझम क्रॅश ब्लु आणि हेझ क्रश सिल्व्हर या रांगांमध्ये उपलब्ध आहेत.  
गॅलॅक्सी A51 आणि Galaxy A71 हे फोन तुम्ही रिटेल दुकानांमधून , Samsung.com आणि इ कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून विकत घेऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com