

Samsung Galaxy A57 5G and Galaxy A37 5G launch in India with expected prices, specs, and features
esakal
सॅमसंगची बहुप्रतिक्षित गॅलेक्सी A-सीरीज अखेर भारतात दाखल होत असून, सॅमसंग गॅलेक्सी A57 5G आणि गॅलेक्सी A37 5G च्या किंमती लाँचपूर्वीच समोर आल्या आहेत. या दोन्ही फोन्सचे अनावरण आज 25 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता ऑनलाइन माध्यमातून होणार असल्याचे LiveMint आणि 91mobiles ने स्पष्ट केले आहे. यावेळची A सीरीज तिच्या प्रीमियम डिझाइन आणि अद्ययावत फीचर्समुळे विशेष चर्चेत आहे.