Samsung: 8GB रॅमसह येणाऱ्या सॅमसंगच्या फोनची विक्री सुरू, अवघ्या ८ हजारांच्या बजेटमध्ये करा खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samsung Galaxy F04

Samsung: 8GB रॅमसह येणाऱ्या सॅमसंगच्या फोनची विक्री सुरू, अवघ्या ८ हजारांच्या बजेटमध्ये करा खरेदी

Samsung Galaxy F04 Sale Starts: काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Samsung Galaxy F04 ची आजपासून (१२ जानेवारी) विक्री सुरू झाली आहे. पहिल्या सेलमध्ये या फोनला फ्लिपकार्टवरून बंपर डिस्काउंटसह खरेदी करता येईल. फोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी, ८ जीबीपर्यंत रॅम सारखे फीचर्स मिळतील.

हेही वाचा: Auto Expo 2023: प्रतिक्षा संपली! बहुचर्चित Maruti Suzuki Jimny 5 door लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

Samsung Galaxy F04 ची किंमत

Samsung Galaxy F04 ची किंमत ९,४९९ रुपये आहे. परंतु, डिस्काउंट ऑफरसह फक्त ७,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. फोन जेड पर्पल आणि ओपल ग्रीन रंगात येतो. फोन खरेदी करताना ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १ हजार रुपये अतिरिक्त सूट मिळेल. डिव्हाइसवर १ वर्षांची वॉरंटी देखील दिली जाते.

हेही वाचा: Auto Expo 2023: रेट्रो लूकसह आली दमदार बाईक, फक्त २ हजारात करा बुक; Royal Enfield-TVS ला टक्कर

Samsung Galaxy F04 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F04 मध्ये ६.५ इंच एचडी प्लस डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल, रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. ड्यूल सिमसह येणारा हा फोन अँड्राइड १२ वर काम करतो.

यात मीडियाटेक हीलियो पी३५ प्रोसेसरसह ८ जीबीपर्यंत व्हर्च्यूअल रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळेल. फोनच्या स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवू शकता.

सॅमसंगच्या या फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात १३ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेऱ्याचा समावेश आहे. तर फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल.

यात पॉवर बॅकअपसाठी १० वॉट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय, ४जी, वाय-फाय, ब्लूटूथ व्हर्जन ५, जीपीएस, एफएम रेडिओ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देखील मिळतील.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

टॅग्स :phoneMobile PhoneSamsung