Samsung Galaxy M53 5G : फक्त 3,949 रुपये देऊन खरेदी करा नवीन 5G फोन ! कसं आम्ही सांगतो

जगभरात 5G नेटवर्क आल्यानंतर प्रत्येकाला 5G फोन खरेदी करायचा आहे
Samsung Galaxy M53 5G
Samsung Galaxy M53 5Gesakal

Samsung Galaxy M53 5G : जगभरात 5G नेटवर्क आल्यानंतर प्रत्येकाला 5G फोन खरेदी करायचा आहे. जर तुम्हीही 5G फोन घेण्याचा विचार करत असाल आणि बजेट कमी पडत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फक्त 3,949 रुपये देऊन तुम्ही नवीन 5G फोन खरेदी करू शकता. मात्र यासाठी काही अटीही आहेत. या किमतीत तुम्ही Samsung Galaxy M53 5G चा 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट खरेदी करू शकता.

Samsung Galaxy M53 5G
Technology News : Hero Super Splendor XTEC लॉन्च, जबरदस्त मायलेज आणि फोनशी करता येणार कनेक्ट

नेमकी ऑफर काय आहे ?

Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनची किंमत 32,999 रुपये असली तरी Amazon वर 33% डिस्काउंट मिळाल्यानंतर हा फोन 21,999 रुपयांना सेलवर मिळत आहे. याशिवाय मोबाईल फोनवर 18,050 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट दिला जातोय. तुम्ही एक्स्चेंज सवलतीचा पुरेपूर फायदा घेतल्यास, तुम्ही फक्त 4,000 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकता. लक्षात ठेवा, हा 5G फोन आहे आणि 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो.

Samsung Galaxy M53 5G
Technology News : Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी TVS घेऊन येत आहे नवीन बाईक, इंजिन असेल मजबूत

स्पेसिफिकेशन

या मोबाईल फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले, तर तुम्हाला यात 120hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल. स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे आणि ती Android 12 वर काम करते. मोबाईल फोनच्या मागील बाजूस 4 कॅमेरे आहेत, ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सेल, दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सेल आणि दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये 32-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. एकंदरीत जर तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल, तर ही डील तुमच्यासाठी बेस्ट आहे.

Samsung Galaxy M53 5G
Technology News : गुगल आणि मेटाचे हजारो कर्मचारी काम न करता पगार घेत होते

दरम्यान, Apple 14 मार्चपासून iPhone 14 आणि iPhone 14 Plus च्या यलो प्रकारांची विक्री सुरू करणार आहे. सध्या तुम्ही Flipkart आणि Amazon द्वारे फोनची प्री-ऑर्डर करू शकता. तुम्ही Apple च्या डीलर Redington India कडून iPhone 14 आणि iPhone 14 Plus विकत घेतल्यास, तुम्ही वेगवेगळ्या ऑफर्सचा फायदा घेऊन 15,000 रुपये वाचवू शकता. iPhone 14 मध्ये तुम्हाला 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. तुम्ही मोबाईल फोन 128 आणि 256GB या दोन स्टोरेज पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.

Samsung Galaxy M53 5G
Mental Health : तुमच्या जवळच्यांपैकी कोणाचा स्वभाव स्वतःचं खरं करण्याचा आहे का? सावधान...

स्मार्टफोनमध्ये A15 बायोनिक चिपसेट सपोर्ट आहे. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला मागील बाजूस 12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे मिळतात आणि समोर सेल्फीसाठी 12 मेगापिक्सेल कॅमेरा देखील देण्यात आला आहे. आयफोन 14 एका चार्जवर 20 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक ऑफर करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com