सॅमसंगचा फ्लॅगशिप फीचर्स असलेला 5G स्मार्टफोन लॉन्च, पाहा किंमत

samsung galaxy s21 fe 5g smartphone launched know specification features price in india
samsung galaxy s21 fe 5g smartphone launched know specification features price in india

सॅमसंगने त्यांचा Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोन अखेर लॉन्च केला आहे. यामध्ये ग्राहकांना अगदी प्रीमियम फीचर्स देण्यात आले असून फोनचे डिझाईन देखील आकर्षक करण्यात आले आहे. Galaxy S21 FE 5G हा सध्या यूएस मार्केटमध्ये सादर करण्यात आले आहे. इतर बाजारपेठांमध्ये त्याच्या उपलब्धतेबद्दल सध्या कोणतीही माहिती कंपनीने दिली नाही. Galaxy S21 FE ही गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Galaxy S20 FE 5G ची अपग्रेड केलेली आवृत्ती असून किंमतीच्या बाबतीत, सॅमसंगचा हा नवीन फोन आयफोन 12 सीरीजला टक्कर देईल.

Samsung Galaxy S21 FE 5G ची किंमत

Samsung Galaxy S21 FE 5G दोन व्हेरिएंटमधअये लॉंच करण्यात आला आहे. फोनच्या 6 GB RAM सह 128 GB स्टोरेजची किंमत $ 699 म्हणजेच सुमारे 52,000 रुपये आहे आणि 8 GB रॅम सह 256 GB स्टोरेजची किंमत $ 769 म्हणजेच सुमारे 57,346 रुपये आहे. Galaxy S21 FE 5G व्हाइट, ग्रेफाइट, लॅव्हेंडर आणि ऑलिव्ह कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. त्याची विक्री 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

स्पेसिफिकेशन्स

Galaxy S21 FE 5G मध्ये Android 12 आधारित One UI 4 देण्यात आला आहे. याशिवाय, यात 6.4-इंचाचा फुल एचडी प्लस डायनॅमिक एमोलेड 2x डिस्प्ले 5 दिला गेला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये 8 GB पर्यंत RAM सह 256 GB पर्यंत स्टोरेज मिळेल. यात स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर मिळते.

samsung galaxy s21 fe 5g smartphone launched know specification features price in india
इसिस कनेक्शन, काँग्रेसच्या माजी आमदाराच्या नातेवाईकाला अटक

कॅमेरा

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर सॅमसंगच्या या फ्लॅगशिप फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत, ज्याचा पहिली लेन्स 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आहे. तर दुसरी लेन्स 12 मेगापिक्सेल वाइड अँगलची आहे आणि तिसरी लेन्स 8 मेगापिक्सल्सची टेलीफोटो लेन्स आहे ज्यामध्ये 30x ऑप्टिकल झूम उपलब्ध असेल. सेल्फीसाठी फ्रंटला 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे

Samsung Galaxy S21 FE 5G ची बॅटरी

या सॅमसंग फोनला 25W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्टसह 4500mAh बॅटरी मिळते. यामध्ये वायरलेस पॉवरशेअर देखील येते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G, Samsung Pay, NFC, फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहेत. वॉटर रेसिस्टंटसाठी फोनला IP68 रेटिंग मिळाली आहे.

samsung galaxy s21 fe 5g smartphone launched know specification features price in india
एका युगाचा अंत! आजपासून BlackBerry फोन होणार बंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com