iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung चा मास्टरस्ट्रोक; येणार जबरदस्त फिचर्स असलेला फोन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung चा मास्टरस्ट्रोक; येणार जबरदस्त फिचर्स असलेला फोन

iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung चा मास्टरस्ट्रोक; येणार जबरदस्त फिचर्स असलेला फोन

Samsung Galaxy S23 Launch News : स्मार्टफोनला भारतासह जगभरात मोठी मागणी आहे. पण लवकरच iPhone 14 ला टक्कर देण्यासाठी बाजारात एक नवीन स्मार्टफोन येणार आहे. सॅमसंगचा नवा प्रीमियम स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी S23चा स्मार्टफोन 2023 च्या पहिल्या आठवड्यात लाँच होणार आहे. दक्षिण कोरियाच्या टेक जायंटने कमी होत चाललेल्या स्मार्टफोन मार्केटमुळे पुढील सीरिज लवकर लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. हा स्मार्टफोन लवकर लाँच करून कंपनीला स्पर्धा कमी करायची आहे. शिवाय लवकर लाँच केल्याने २०२३ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीला जास्त नफा मिळण्याची अपेक्षा आहे. सॅमसंग कंपनीने २०२२ मध्ये ठरवलेल्या विक्रीपेक्षा कमी स्मार्टफोन विकले आहेत.

सॅन फ्रान्सिस्को, यूएसए येथे एक कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमात कंपनी Galaxy S23 स्मार्टफोनचे उद्घाटन करेल अशी अपेक्षा आहे. गॅलेक्सी S23 हँडसेट 17 फेब्रुवारीच्या आसपास खरेदीसाठी बाजारात उपलब्ध होतील. स्मार्टफोनचे मार्केट दरवर्षी 10 टक्याने कमी होत आहे. त्यामुळे  कंपनीला नफा मिळवण्यासाठी कंपनी लवकरच Galaxy S23 मालिका लाँच करणार आहे.

हेही वाचा : भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

Galaxy S23 स्मार्टफोनची बॅटरी (Samsung Galaxy S23 Specifications feature)

GalaxyClub च्या रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S23+ स्मार्टफोनमध्ये 4700mAh बॅटरी असेल. जे Samsung Galaxy S23 Ultra पेक्षा 100mAh जास्त आहे. Samsung Galaxy S23 Ultra च्या टॉप लाइनअपला 5000mAh बॅटरी मिळेल. जी Galaxy S22 Ultra पेक्षा मोठी आहे.

हेही वाचा: Netflix लाँच करत आहे नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन; वाचा काय आहे प्लॅन

Galaxy S23 मालिका कॅमेरा

Galaxy S23 स्मार्टफोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 10MP टेलिफोटो कॅमेरा आणि 3X ऑप्टिकल झूम सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय अल्ट्रा वाईड कॅमेरा अँगल देण्यात आला आहे. Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23+ मध्ये 12MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे.

या सीरिजच्या टॉप मॉडेलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो अशी बातमी आहे. त्याचा कॅमेरा 50MP आहे. याशिवाय 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

 Samsung Galaxy S23 स्मार्टफोनची किंमत

 Samsung Galaxy S23 स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही. सॅमसंग गॅलेक्सी S23 स्मार्टफोनची भारतात किंमत सुमारे 1 लाख रुपये असू शकते.