Samsung Galaxy S24 Made in India : भारतात तयार होणार सॅमसंगची S24 सीरीज; सर्व फोनवर लिहिलेलं दिसणार 'मेड इन इंडिया'

केवळ भारतासाठीच नव्हे, तर ग्लोबल मार्केटसाठी हे उत्पादन घेतलं जाईल. म्हणजेच, जगभरातील S24 सीरीजच्या स्मार्टफोनवर 'Made in India' असं लिहिलेलं दिसेल.
Samsung Galaxy S24 Made in India
Samsung Galaxy S24 Made in IndiaeSakal

Samsung Galaxy S24 Made in India : सॅमसंगने काही दिवसांपूर्वीच आपली नवी स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. Samsung Galaxy S24 या लेटेस्ट सीरीमध्ये कंपनीने गॅलेक्सी एआयचे तगडे फीचर्स दिले आहेत. या सीरीजचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आता समोर आलं आहे. या सीरीजमधील सर्व स्मार्टफोन हे भारतात तयार होणार आहेत.

या सीरीजमध्ये सॅमसंगने Galaxy S24, S24 Plus आणि S24 Ultra असे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या तिन्ही स्मार्टफोनचं उत्पादन हे भारतात घेतलं जाणार आहे. केवळ भारतासाठीच नव्हे, तर ग्लोबल मार्केटसाठी हे उत्पादन घेतलं जाईल. म्हणजेच, जगभरातील S24 सीरीजच्या स्मार्टफोनवर 'Made in India' असं लिहिलेलं दिसेल.

सॅमसंग इंडियाचे प्रेसिडेंट आणि सीईओ जे. बी. पार्क यांनी याबाबत अधिक माहिती दिली. "संपूर्ण जग सध्या एआयबाबत चर्चा करत आहे. मात्र, सॅमसंगने आपल्या ग्राहकांना एआयचा अनुभव घेण्याची संधी दिली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस24 सीरीजमधील स्मार्टफोन हे भारतातील नोएडामध्ये असणाऱ्या आमच्या फॅक्टरीमध्ये तयार होणार आहेत. हे सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे." असं पार्क यांनी सांगितलं.

Samsung Galaxy S24 Made in India
Galaxy AI Features : कॉल ट्रान्सलेशन अन् बरंच काही.. कसे आहेत सॅमसंगच्या 'गॅलेक्सी एआय'चे फीचर्स? पाहा व्हिडिओ

सॅमसंग इंडियाचे सीनियर व्हॉईस प्रेसिडेंट राजू पुल्लन यांनीदेखील याची पुष्टी केली आहे. भारतात गॅलेक्सी S24 या स्मार्टफोनच्या 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 79,999 रुपये आहे. तर 8GB+512GB व्हेरियंटची किंमत 89,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. गॅलेक्सी S24 अल्ट्रा या स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरियंटची किंमत 1,29,999 रुपये आहे. 12GB+512GB व्हेरियंटची किंमत 1,39,999 रुपये असणार आहे. तर 12GB+1TB व्हेरियंटची किंमत 1,59,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com