

Samsung Galaxy S26 series launch price specifications
esakal
सॅमसंगची बहुप्रतिक्षित Samsung Galaxy S26 सिरीज 25 फेब्रुवारीला लाँच झाली असून यामध्ये फ्लॅगशिप Samsung Galaxy S26 Ultra ने तंत्रज्ञानाच्या जगात नवीन बेंच मार्क सेट केले आहेत. या फोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचा 6.9 इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले ज्यामध्ये 3000 निट्सपर्यंतची पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये प्रथमच प्रायव्हसी डिस्प्ले हे फिचर दिले आहे ज्यामुळे तुमच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला स्क्रीनवरचा कंटेंट दिसणार नाही जे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.