

Samsung Galaxy S27 Ultra & Pro Specs Leaked: 200MP Camera & 5700mAh Battery
esakal
Samsung Galaxy S27 Ultra & Pro Specs: Appleच्या iPhone लाँचिंगनंतर आता टेक जगतातील दिग्गज कंपनी सॅमसंग (Samsung) आपल्या पुढील सर्वात मोठ्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजसाठी सज्ज झाली आहे. कंपनीची बहुप्रतिक्षित 'Samsung Galaxy S27' सीरिज 2027 च्या सुरुवातीला बाजारात धडकणार असून, लाँचिंगपूर्वीच या सीरिजचे महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स आणि डिझाईन लिक्स समोर आले आहेत.
या नव्या लाईनअपमध्ये कंपनी फक्त डिझाईनच नाही, तर कॅमेरा, प्रोसेसर, डिस्प्ले आणि बॅटरी तंत्रज्ञानात मोठे क्रांतिकारी बदल करण्याच्या तयारीत आहे. या सीरिजशी संबंधित सर्व सविस्तर डिटेल्स खालीलप्रमाणे आहेत-