esakal | Galaxy Watch : सॅमसंगचे गॅलक्सी वाॅच ४, काय आहे विशेष!
sakal

बोलून बातमी शोधा

गॅलक्सी वाॅच ४

Galaxy Watch : सॅमसंगचे गॅलक्सी वाॅच ४, काय आहे विशेष!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद - सॅमसंगने भारतीय बाजारपेठेत गॅलक्सी वाॅच ४ (Galaxy Watch 4) हे तंत्रज्ञानस्नेही घड्याळ बाजारात आणले आहे. यात दोन माॅडेल्स आहेत, एक गॅलक्सी वाॅच ४ आणि दुसरी गॅलक्सी वाॅच ४ क्लासिक. हे घड्याळ तुमचे आरोग्य व तंदुरुस्ती चांगल्या प्रकारे सांगण्यास मदत करेल. स्मार्ट वाॅच तुम्हाला आनंद आणि आरोग्याकडे नेईल, असा विश्वास सॅमसंग इंडियाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सॅमसंग बायोअॅक्टिव्ह सेन्साॅरने गॅलक्सी वाॅचच्या माध्यमातून मोठे संशोधन सर्वांसाठी खुले केले आहे. गॅलक्सी वाॅच ४ (४४ मीमी) - २६९९९, तर गॅलक्सी (४० मीमी) - २३ हजार ९९९, दुसरीकडे गॅलक्सी वाॅच ४ क्लासिक (४२ मीमी) ३१९९९, गॅलक्सी वाॅच ४ क्लासिक (४६ मीमी) - ३४९९९ अशी किंमत आहे (सॅमसंगच्या संकेतस्थळानुसार).

हेही वाचा: भन्नाट! 32 इंची Smart LED TV फक्त 4999 रुपयांत

- स्मार्ट घड्याळाच्या मदतीने तुमच्या आरोग्याकडे लक्ष देता येईल.

- शरीरातील चरबीचे प्रमाण, पाणी आणि इतर माहिती सांगेल.

- तुमच्या आरोग्याचे गोल्सपर्यंत कसे पोहोचायचे याबाबत गॅलक्सी वाॅच मदत करेल.

loading image
go to top