फोन अधिक सुरक्षित हवाय?; सॅमसंगचे‘क्वीक स्वीच’ आणि ‘कंटेंट सजेशन्स’ आहेत रेडी

जाहिरात
Wednesday, 30 September 2020

मसंगने तुमच्यासाठी बाजारात एक भन्नाट फिचर आणलंय. फक्त एक डबल क्लिक आणि करा प्रायव्हेट डाटा सुरक्षित. हो..पॉवर बटणावर दोनदा क्लिक करा आणि प्रायव्हेट करून थेट मेन गॅलरीत एका सेकंदापेक्षाही कमी वेळात तुम्ही जाऊ शकता. हे किती सिंपल असेल हे स्मार्टफोन युजर्सना अद्याप कळालंही असेल. 

तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमच्या वरिष्ठांबद्दल तुमच्या फोनमध्ये काही विनोदी फोटो किंवा मीम्स असलेला मजकूर बघून हसले आणि त्याचक्षणी तुमच्या वरिष्ठांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी तुमच्याकडे तुमचा फोन मागितला तर? तर नो वरीज्..आता बिनघास्त असा डेटा तुम्ही सेक्युअर करू शकता. कारण सॅमसंगने तुमच्यासाठी बाजारात एक भन्नाट फिचर आणलंय. फक्त एक डबल क्लिक आणि करा प्रायव्हेट डाटा सुरक्षित. हो..पॉवर बटणावर दोनदा क्लिक करा आणि प्रायव्हेट करून थेट मेन गॅलरीत एका सेकंदापेक्षाही कमी वेळात तुम्ही जाऊ शकता. हे किती सिंपल असेल हे स्मार्टफोन युजर्सना अद्याप कळालंही असेल. 

प्रायव्हसी हा नवीन फंडा शोधून सॅमसंगने आपल्या युजर्सना अधिक सुरक्षित आणि स्मार्ट केले आहे. या फिचर्सच्या मदतीने युजर स्वत:चं डोकं शांत ठेऊन त्याच्या इतर कामांना वेळ देऊ शकेल अशी खात्री सॅमसंगने व्यक्त केली आहे. स्मार्टफोनच्या दुनियेतील प्रतिष्ठित कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सॅमसंगने 'क्वीक स्वीच' नावाचं एक नवीन फिचर लॉन्च केलंय. यात फक्त डबल क्लिक करून तुम्ही तुमची सर्व माहिती सेक्युअर करून बिनधास्त राहू शकता. तुमचा फोन कोणाच्याही हातात अगदी नि:संकोचपणे देऊ शकता. या बरोबरच सॅमसंगने 'इंटेलीजेंट कंन्टेंट सजेशन्स' नावाचं आणखी एक फिचर लॉन्च केलंय. ज्यात तुम्हाला तुमचा कोणता डेटा सेक्युअऱ ठेवावा याबाबत सजेशन्स देत राहील. सिक्रेट लॉकर म्हणून हे फिचर्स तुमच्यासाठी काम करत राहतील.

तुम्ही तुमच्या फोनमध्ये कसं वापरू शकता हे फिचर ? 

सध्यातरी सॅमसंगने आपल्या गॅलक्सी A51 आणि गॅलक्सी A71 या फोन्ससाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे. तुम्ही जर सॅमसंगच्या या फोन्सचे य़ुजर्स असाल तर ही सुविधा तुमच्यासाठी आहे. यात तुम्ही तुमच्या व्हॉस्ट्सअपसह, ब्राऊझर आणि इतरही काही डेटा सेक्युअर करू शकाल. आपले खासगी फोटोज, व्हीडीओज तुम्ही एक डबल क्लिककरून इतरांपासून दूर ठेऊ शकता.

मध्यम श्रेणी फोन्समध्ये सॅमसंगचं पुढचं पाऊल- 

सॅमसंगने गॅलक्सी A51 आणि A71 या मध्यम किंमतीच्या फोन्समध्ये हे महत्वाचं पाऊल उचललं आहे. ज्यात हजारो लोक या फोन्सचा वापर करून स्वत:ला सेक्युअर ठेऊ शकतील. युजर्स आपला प्रायव्हेट तसेच प्रोफेशनल डेटा यात वेगवेगळा ठेऊन तो आपल्याला हवा तसा हवा तिथे साठवून ठेऊ शकतील. या ऑलरांउडर फोन्सना आपली पसंती दर्शवून ग्राहक सर्वोत्तम अनुभवासाठी आगदीच बिनधास्तपणे एक्सप्लोअर करू शकतात.   

   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samsung Quick Switch and Content Suggestions are the answer to all your smartphone privacy woes