सॅमसंग गॅलेक्सी A51 आणि A71 मधील क्विक स्विच आणि इंटेलिजंट कन्टेन्ट सजेशनमुळे मोबाईल प्रायव्हसी वेगळ्या उंचीवर 

Samsung takes privacy to a whole new level with Quick Switch and Intelligent Content Suggestions
Samsung takes privacy to a whole new level with Quick Switch and Intelligent Content Suggestions

जरा कल्पना करा तुम्ही एका पार्टीमध्ये आहात, तिथे कोणी तरी तुमचा फोन तुमचे आणि तुमच्या मित्रमंडळींचे फोटो काढण्यासाठी सहज मागितला. मात्र आपल्या फोनमधील प्रायव्हेट डेटामुळे फोन दुसऱ्याच्या हातात देणं जरासं चिंताजनकच वाटतं ना. तसेच अशावेळेस तुम्ही फोन दिल्यानंतर माझे व्हाट्स अॅपवरील चॅट्स कोणी वाचले तर? हा प्रश्न देखील तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे. मात्र जर तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी A51 किंवा Galaxy A71 फोन वापरत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ क्विक स्विच फिचर वापरावं लागेल. 

क्विक स्विच फीचरमुळे तुमच्या मोबाईलमधील ऍप्लिकेशन, गॅलरी किंवा व्हाट्स अॅपमधून तुम्हाला वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रोफाइलमध्ये क्षणात स्विच करता येऊ शकतं, यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या मोबाईलवरील पॉवर बटनवर डबल क्लिक करायचं आहे.आहे ना भन्नाट? नक्कीच आहे. 

खालील व्हिडिओमध्ये अभिनेत्री राधिका मदन आणि अभिनेता सनी सिंह पाहायला मिळत आहेत. सनी राधिकाच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारत आहे. सनी राधिकाला भेटायला लायब्ररीत येतो. मात्र राधिका त्याच्याच वाढदिवसासाठी एका सरप्राईज पार्टीचं आयोजन करत आहे हे मात्र त्याला माहित नाहीये. सनी राधिकाच्या हातातील मोबाईल घेणार, तोच राधिका क्विक स्विच फिचर वापरते आणि पुढे काय होतं? ते तुम्हीच पाहा. 

हे फिचर योग्य पद्धतीने कसं वापरायचं आणि ऍक्टिव्ह करायचं हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पाहा 

यामध्ये इंटेलिजंट कन्टेन्ट सजेशन हे फिचर देखील आहे. ज्यामध्ये या मोबाईलमधील 'ऑन डिव्हाईस AI' तुम्हाला कोणते फोटो प्रायव्हेट ठेवायला हवेत हे सजेस्ट करेल. यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या फोटोजनां टॅग करायचं आहे. टॅग केल्यामुळे ज्या गोष्टी सेफ ठेवायच्या आहेत त्या सगळ्या सिक्युअर्ड फोल्डरमध्ये ठेवल्या जातील. बाकी सर्व काम AI करून टाकेल. बघा हे इतकं सोपं आहे. आपण हे फिचर कसं वापरू शकतो ते पाहण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पाहा.

आता तुमचा फोन घरातील सदस्यांच्या किंवा नातलगांच्या हातात बिनधास्त द्या. आता तुमच्या मनात कोणतीही भीती ठेवण्याची गरज नाही. या भन्नाट फीचरमुळे आता तुम्ही तणावमुक्त 'अल्ट Z' लाईफ जगू शकतात. तुमचं खासगी जीवन कायम खासगीच राहायला हवं असं आम्ही मानतो. म्हणूनच 'अल्ट Z' लाईफ म्हणजेच प्रायव्हसी. 

गॅलेक्सी A51 आणि  A71 चे पॅकेज डील्स 

गॅलेक्सी A51 आणि A71 हे मोबाईल फोन पूर्णतः ऑल राउंडर आहेत. कारण  या फोनमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी रेझर थिन बेझल्स आणि सेल्फी कॅमेर्‍यासाठी होल पंच कटाऊट आहेत. केवळ इतकंच नाही, तर या मोबाईलमध्ये आहे भन्नाट डिस्प्ले, दीर्घ वेळ चालणारी बॅटरी आणि क्वाड कॅमेरा सेटअप. तुम्हाला अजून काय हवंय. गॅलेक्सी A71 हा मोबाईल फोन 6.7 इंचाच्या सुपर AMOLED Plus डिस्प्लेसह येतो तर A51 हा मोबाईल 6.5 इंच सुपर Super AMOLED फुल एचडी प्लस डिस्प्लेसह येतो.

या मोबाईलमधील क्वाड कॅमेरा सेटअप एकदम भन्नाट आहे 

गॅलेक्सी A71 फोनमध्ये तुम्हाला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर कॅमेरा मिळतो, दुसरा कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड लेन्स सोबतच 123 डिग्री फिल्ड ऑफ व्ह्यू सोबत आहे. सोबतच 5 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तुम्हाला एखाद्याचा क्लोजअप फोटो, पोट्रेट फोटो, तुमच्या समोर असलेल्या लँड्स्केपचा अल्ट्रा वाईड फोटो काढायचा असल्यास गेलेक्सी A71 चा कॅमेरा या फोटोंमध्ये पारंगत आहे. गॅलेक्सी A51 मध्ये  48 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर कॅमेरा,12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड लेन्स कॅमेरा, 5 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स कॅमेरा असणार आहे. दोन्ही मोबाईलमध्ये 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा फ्रंटला आहे.

या क्वाड कॅमेरा सेटपमुळे तुमचं इंस्टाग्राम फीड एका वेगळ्याच लेव्हलला गेल्याशिवाय राहणार नाही. नुकतेच या दोन मोबाईल सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल केल्यानंतर गॅलेक्सी A51 आणि A71 मध्ये फ्लॅगशिप सिंगल टेक कॅमेरा फिचर, नाईट हायपरलॅप्स, कस्टम फिल्टर्स व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना स्विच कॅमेरा फिचर, क्विक व्हिडीओ, स्मार्ट सेल्फी आणि AI गॅलरी झूम हे फीचर्स देण्यात आले आहेत. 

मग, अल्ट Z लाईफसाठी ऑल सेट

गॅलेक्सी A71 आणि A51 या फोनमध्ये स्मार्टफोन इंडस्टीमधील विविध नाविन्यपूर्ण कल्पना सर्व प्रथम वापरण्यात आल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फोन्स दिसायला खूपच मनमोहक आहेत. क्विक स्विच आणि इंटेलिजंट कन्टेन्ट सजेशन फीचरमुळे आता तुम्ही अल्ट Z लाईफचा लाभ घेऊ शकता.  जिथे प्रायव्हसी तुमच्या हातात असेल. तुम्ही कुठे बाहेर जाताय, तुम्ही कुठे पार्टीत आहेत किंवा अगदी तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत असाल तेव्हा तुम्हाला हे फोन वापरण्यात नक्कीच आनंद मिळेल. यासाठी आम्ही तयार आहोत .... तुम्ही तयार आहात का?
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com